India Vs Australia 4th Test: Cheteshwar Pujara  पुजाराचं द्विशतक हुकलं, भारत मजबूत स्थितीत
चेतेश्वर पुजारा (Photo Credit-PTI)

India Vs Australia 4th Test: सिडनी कसोटी (Sydney) सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारत मजबूत स्थितीमध्ये आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि हनुमा विहारी  या जोडीने दमदार फलंदाजी करत भारताची धावसंख्या 400 च्या पार नेऊन ठेवण्यास मदत केली आहे. पहिल्या दिवशी पुजाराने शतकी खेळी केल्यानंतर आज तो द्विशतकाच्या उंबरठ्यावर होता मात्र 193 धावांवर पुजारा आऊट झाला आहे. नॅथन लॉयन त्याची विकेट घेतली. हनुमा विहारी सोबत भागीदारी करत पुजाराने आज दुसर्‍या दिवशी 150 धावांचा टप्पा पूर्ण केला. आता रविंद्र जडेजा मैदानात उतरला आहे.

भारतीय संघाने काल टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत या चार कसोटी सामन्यांमध्ये भारताकडे 2-1 अशी आघाडी आहे. चौथा कसोटी सामना जिंकत मालिका खिशात घालणं हेच भारतीय संघाचं उद्दिष्ट आहे.