
Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad, 43rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 43 वा सामना, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद 25 एप्रिल (शुक्रवार) रोजी एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला जात आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या आठ सामन्यांपैकी फक्त दोनच सामने जिंकले आहेत आणि ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहेत, तर हैदराबादचा संघ देखील आठ सामन्यांपैकी फक्त दोनच सामने जिंकून नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, आजचा सामना 'करो या मरो' असेल. या रोमांचक सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने 19.5 षटकात दहा गडी गमावून हैदराबादसमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
SRH restrict the hosts to 154 🎯#CSKvSRH LIVE: https://t.co/xTq3bk0Lp0 pic.twitter.com/l1O51J2y9o
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 25, 2025
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात निराशाजनक झाली. चेन्नईने निर्धारित 19.5 षटकांत दहा गडी गमावून 154 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून डेवॉल्ड ब्रेव्हिसने 42 धावांची सर्वाधिक खेळी केली. या खेळीदरम्यान, त्याने 25 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, आयुष म्हात्रेने 30 धावांचे योगदान दिले.
दुसरीकडे, मोहम्मद शामीने पहिल्या षटकात पहिल्याच चेंडूवर सनरायझर्स हैदराबाद संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. सनरायझर्स हैदराबादकडून हर्षल पटेलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर कर्णधार पॅट कमिन्सने दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाला 20 षटकांत 199 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.