कोलंबो: भारतीय क्रिकेट संघाने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रीलंकेचा क्लीन स्वीप केला. आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका (IND vs SL ODI Series 2024) 2 ऑगस्टपासून सुरू होत आहे. पहिला सामना कोलंबोतील प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर (R.Premadasa Stadium, Colombo) होणार आहे. दोन्ही संघ सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. अशा स्थितीत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार हे नक्की. मात्र, त्याआधी जाणून घेऊया या सामन्यादरम्यान स्टेडियमच्या खेळपट्टीचा मूड कसा असेल? (हे देखील वाचा: IND vs SL 1st ODI Playing 11: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात गंभीर-रोहित कोणाला देणार संधी, कोण बसणार बॅचवर; जाणून घ्या काय असू शकते प्लेइंग 11)
प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना कोलंबोतील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. कोलंबोच्या या मैदानावर फलंदाजांचे वर्चस्व आहे. चेंडू बॅटला खूप चांगला आदळतो आणि धावा काढताना फारशी अडचण येत नाही. मात्र, दुसऱ्या डावात खेळपट्टी निश्चितच थोडी संथ होते.
खेळपट्टी फिरकीपटूंनाही मदत देते
फलंदाजांसोबतच खेळपट्टी फिरकीपटूंनाही खूप मदत करते. कोलंबोमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विक्रम मजबूत राहिला आहे. या मैदानावर पाठलाग करणे हे अत्यंत अवघड काम आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
भारत-श्रीलंका हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 168 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने 99 सामने जिंकले आहेत, तर लंकेच्या संघाने 57 सामने जिंकले आहेत. 1 सामना टाय झाला आणि 11 सामने निकालाशिवाय राहिले. आता जर भारतीय संघ पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेला पराभूत करण्यात यशस्वी ठरला, तर हा भारताचा एकदिवसीय प्रकारातील श्रीलंकेविरुद्धचा 100 वा विजय असेल.
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.
वनडे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ: चरित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सादिरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, झेनिथ लियानागे, निशान मदुष्का, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलागे, चमिका करुणारत्ने, महिष थेक्षाना, अकिला धनंजय, असिथा फर्नांडो, कुसल जानिथ, प्रमोद मदुशन आणि जेफ्री वँडरसे.