
Champions Trophy 2025 Prize Money: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रविवारी भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात खेळला जाईल. जर टीम इंडिया तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) जिंकण्यात यशस्वी झाली तर त्यावर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडेल. संघ हरला तरी संघाच्या खात्यात चांगली रक्कम जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्याला देण्यात येणाऱ्या बक्षीस रकमेबद्दल बोलायचे झाले तर, हा आकडा 19.5 कोटी रुपये आहे. India vs New Zealand, ICC Champions Trophy 2025 Final: पावसामुळे फायनल रद्द झाली तर कोण जिंकेल? रिझर्व्ह डेचे नियम काय? जाणून घ्या
अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला आयसीसीकडून 9.75 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल. यानंतर, जर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांला 4.85 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल. आयसीसीने जाहीर केल्याप्रमाणे, स्पर्धेत पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना 3 कोटी रुपये, तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना 1.2 कोटी रुपये बक्षीस दिले जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी बक्षीस रक्कम
विजेता संघ - 19.5 कोटी रुपये
उपविजेता संघ - 9.75 कोटी रुपये
उपांत्य फेरीत पोहोचलेले दोन संघ – 4.85 कोटी रुपये
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळला जाणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना जिंकून टीम इंडिया पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद जिंकण्याच्या दिशेने लक्ष केंद्रित करत आहे. यापूर्वी, टीम इंडियाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच हे विजेतेपद जिंकले होते.