![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/pak-vs-nz-3-.jpg?width=380&height=214)
Cat Stops Play In Karachi: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ पाकिस्तान (Pak vs NZ )एकदिवसीय तिरंगी मालिका (पाकिस्तान एकदिवसीय तिरंगी मालिका, 2025) चा अंतिम सामना 14 फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. क्रिकेटच्या इतिहासात, प्राण्यांमुळे खेळ अनेकदा व्यत्यय आला आहे. कधी श्वान, साप, तर कधी चाहते मैदानात घुसले आहेत. यावेळी कराचीतील नॅशनल बँक स्टेडियमवर झालेल्या ट्राय-सिरीज 2025च्या अंतिम सामन्यादरम्यान एका मांजरीने खेळ थांबवला.
या सामन्यात, 24 व्या षटकाच्या शेवटी, मांजर मैदानावर आली आणि हळूहळू सीमारेषा ओलांडून बाहेर गेली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो आता व्हायरल झाला आहे. याआधीही एक मांजर मैदानात घुसली होती. ज्यामुळे खेळ काही काळ थांबवण्यात आला होता. (NZ Beat PAK, ODI Tri-Series 2025 Final Match Scorecard: पाकिस्तानला हरवून न्यूझीलंडने जिंकले विजेतेपद, डॅरिल मिशेल आणि टॉम लॅथमने खेळली अर्धशतकी खेळी)
मैदानात घुसली मांजर, खेळ थांबवावा लागला
We've got some feline company enjoying cricket on the ground 🐈⬛🤩#3Nations1Trophy | #PAKvNZ pic.twitter.com/Nx2RMmzA82
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 14, 2025
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेटने एक्स वर शेअर केलेल्या 40 सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सामन्यादरम्यान एक काळी मांजर मैदानात प्रवेश करताना दिसत आहे. ही मांजर संपूर्ण मैदानात फिरते. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पाकिस्तान क्रिकेटने लिहिले आहे की, आमच्याकडे मैदानावर मांजर क्रिकेटचा आनंद घेत आहे. पण नेटकऱ्यांकडून अनेक तर्क लावल्या जात आहे. काळी मांजर मैदानातून गेली त्यामुळे पाकिस्तानने मॅच गमावली, असे काही जण म्हणत आहे.