Photo Credit- canadiancricket/TheOmanCricket

CAN vs OMA 2nd T20I Tri-Series 2024 Scorecard: कॅनडा (CAN) विरुद्ध ओमान (OMA) टी20 तिरंगी मालिका काल सोमवारी किंग सिटी येथील मॅपल लीफ येथे नॉर्थ-वेस्ट ग्राउंडवर खेळली (Maple Leaf North-West Ground) गेली. कॅनडा त्रिकोणी मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात(Canada vs Oman T20I Tri-Series 2024) ओमानने कॅनडाचा 8 गडी राखून पराभव करत शानदार विजय मिळवला. ओमानने प्रथम गोलंदाजी करताना कॅनडाचा डाव 106 धावांत गुंडाळला. या विजयामुळे ओमानचा आत्मविश्वास उंचावणार आहे. या विजयात कर्णधार आकिब इलियास याने 53 धावा करत महत्त्वाची भूमिका बजावली.  (हेही वाचा:Mumbai vs Rest of India Irani Cup 2024 Live Streaming: इराणी चषक स्पर्धेत मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया आज आमनेसामने; सामन्याचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? येणार जाणून घ्या)

ओमानने नाणेफेक जिंकून कॅनडाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर कॅनडाची खूपच खराब सुरुवात झाली. 19.5 षटकात केवळ 106 धावा करून संपूर्ण संघ तंबूत गेला. ज्यामध्ये निकोलस किर्टनने 21 चेंडूत 18 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे संघ चांगली कामगिरी करेल अशी आशा काही काळ निर्माण झाली होती. त्याशिवाय, साद बिन जफर (15) आणि हर्ष ठाकर (14) यांनीही संघाला काही धावा दिल्या, मात्र त्या विजयासाठी पुरेशा ठरल्या नाहीत.

दुसरीकडे, ओमानने शानदार सुरुवात केली. अवघ्या 15 षटकांत 107 धावा करून विजय मिळवला. ज्यामध्ये आकिब इलियासने 46 चेंडूत 53 धावा करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. शोएब खानने 31 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या, तर कश्यप प्रजापतीने 11 चेंडूत 13 धावा जोडून संघाला विजय मिळवून दिला. त्याचबरोबर कॅनडाच्या गोलंदाजांनीही निराशा केली असून, डायलन हेलिगरला एकमेव विकेट मिळाली आहे. ओमानच्या गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. ज्यामध्ये कलीमुल्ला याने (3.5 षटके, 17 धावा, 2 विकेट) आणि आकिब इलियास याने (4 षटके, 20 धावा, 2 विकेट) घेत प्रमूख भूमिका बजावली. फैयाज बट्टनेही 4 षटकात 21 धावा देत 2 बळी घेत कॅनडाची फलंदाजी उद्ध्वस्त केली.