PC-X

T20 World Cup 2024 Celebration: टीम इंडियाने इंग्लंडमध्ये टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या विजयाचा आनंद साजरा केला. 29 जून रोजी भारताने टी 20 विश्वचषक जिंकून एक वर्ष पूर्ण केले. त्या आनंदात बर्मिंगहॅममध्ये केक कापण्यात आला. या दरम्यान, भारतीय संघातून निवृत्त झालेल्या खेळाडूंनाही शुभेच्छा देण्यात आल्या. इंग्लंड दौऱ्यावर गेलेली टीम इंडिया सध्या बर्मिंगहॅममध्ये आहे. जिथे त्यांना 2 जुलैपासून दुसरा कसोटी सामना खेळायचा आहे. भारतीय संघ त्या कसोटी सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. परंतु, दरम्यान, ते 2024 च्या टी 20 विश्वचषक 2024 च्या यशाचा पहिला वर्धापन दिन साजरा करायला विसरले नाही.

टी-20 विश्वचषक विजयाचे एक वर्ष पूर्ण, केक कापला

बीसीसीआयने टी-20 चॅम्पियन बनल्याच्या एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल टीम इंडियाने केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. जिथे खेळााडूंनी एक नाही तर दोन केक कापले. एक टीम इंडियाच्या नावे आणि दुसरा टी-20 विश्वचषक 2024 मधील त्यांच्या यशाच्या नावे. जल्लोषात भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत होता.

केक कापण्याबाबत गोंधळ!

टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकले. पण तो बर्मिंगहॅममध्ये नव्हता. आणि हेच सर्व गोंधळाचे मूळ होते. त्यानंतर स्पर्धेत सर्वाधिक 17 विकेट्स घेणारा खेळाडू अर्शदीप सिंग याला केक कापण्यासाठी पुढे आणले गेले. अर्शदीपने जसप्रीत बुमराहला पुढे येण्यास सांगितले आणि मग त्याने केक कापला.

पंत आणि बुमराहने रवींद्र जडेजाला निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या

केक कापल्यानंतर सर्व खेळाडूंनी एकमेकांना केक भरवला. त्यानंतर ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांनीही रवींद्र जडेजाला निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. 29 जून 2024 रोजी टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रवींद्र जडेजाने क्रिकेटच्या या स्वरूपातून निवृत्तीची घोषणा केली.