एरिका जेम्स (Photo Credit: @CricketAus/Twitter)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तृतीयपंथीयांच्या क्रिकेटमध्ये समावेशाबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. क्रिकेटच्या इतिहासातील हा एक सर्वात मोठा निर्णय असेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या क्रिकेट संघामध्ये एका तृतीयपंथी व्यक्तीला स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय त्यांच्या क्रिकेट मंडळाने याबाबत खास नियमही बनवले आहेत. आजवर एकही क्रिकेट मंडळाने तृतीयपंथी व्यक्तीला आपल्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान दिले नव्हते. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाच्या अनुसार जर एखादी तृतीयपंथी राज्य स्तरावर चांगली कामगिरी करत असेल, तर तिला राष्ट्रीय संघातही स्थान देण्यात हरकत नसल्याचे त्यांचे मत आहे.

शिवाय, जर एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीला राष्ट्रीय क्रिकेट संघातून खेळायचे असेल तर त्यांना टेस्टोस्टेरोन चाचणी द्यावी लागेल, असेही ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने स्पष्ट करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटनुसार खेळाडूने त्यांची लिंग ओळख क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अखंडतेच्या प्रमुखपदावर नामित केली पाहिजे आणि हे दर्शविले पाहिजे की त्यांचे निवडलेले लिंग त्यांच्या दैनंदिन जीवनाशी सुसंगत आहे. आणि त्यांनी हे देखील सिद्ध केले पाहिजे की, नामनिर्देशन करण्यापूर्वी किमान 12 महिन्यांपर्यंत त्यांच्याकडे प्रतिलिटर 10 नॅनोमोलपेक्षा कमी टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण आहे. या तृतीयपंथी व्यक्तीचे नाव एरिका जेम्स असे आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहेत, तर एएफएलच्या धोरणाला प्रतिलिटर 5 नॅनोमोलची मर्यादा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भाग घेणार्‍या ट्रान्सजेंडर खेळाडूंना लागू असणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या लिंग ओळख धोरणानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मार्गदर्शकतत्त्वे तयार केली आहेत.