भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Boder-Gavaskar Trophy 2023) खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांची कामगिरी अप्रतिम होती. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवायही (Jasprit Bumrah) टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. आता बुमराहच्या पुनरागमनासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतून आधीच बाहेर असलेला बुमराह आता आणखी एका मालिकेतून बाहेर पडला आहे.

बुमराह दुसऱ्या मालिकेतून बाहेर

जसप्रीत बुमराह मागील काही काळापासून पाठीच्या समस्येशी झुंज देत आहे आणि 25 सप्टेंबर 2022 पासून तो भारताकडून खेळलेला नाही. बुमराहने दुखापतीमुळे टी-20 वर्ल्ड आणि अनेक मोठ्या मालिका सोडल्या आहेत. शेवटच्या दोन कसोटीत तो खेळेल अशी अपेक्षा होती, पण गेल्या आठवड्यात तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडल्याची बातमी आली होती. आता, बुमराहची उपलब्धता आणि तंदुरुस्ती संदर्भात माहिती मिळत आहे की वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेलाही मुकणार आहे. (हे देखील वाचा: तीन भारतीय स्टार क्रिकेटपटू ज्यांची कसोटी कारकीर्द संपणार, लवकरच करू शकतात निवृत्तीची घोषणा)

आता थेट दिसणार आयपीएलमध्ये

2023 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या समाप्तीनंतर, भारत आणि ऑस्ट्रेलिया 17, 19 आणि 22 मार्च रोजी तीन एकदिवसीय सामने खेळणार आहेत. पण बुमराह या मालिकेतही खेळणार नाही. आता हा गोलंदाज थेट इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि भारतात होणार्‍या एकदिवसीय वर्ल्ड कपमुळे बुमराहच्या फिटनेसची विशेष काळजी घेतली जात आहे.