IND vs BAN 1st Test 2024: भारताने पहिल्या चेन्नई कसोटीत बांगलादेशचा 280 धावांनी पराभव करून (IND Beat BAN 1st Test 2024) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र बांगलादेशचा संघ 234 धावांवर गडगडला. भारताच्या या विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. (हे देखील वाचा: India Beat Bangladesh 1st Test: चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशचा उडवला 280 धावांनी धुव्वा, विजयाचे ठरले 'हे' सर्वात तीन मोठे कारण)
भारताचे गुणतालिकेत अव्वल स्थान मजबूत
भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थान मजबूत केले आहे. तर बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला आहे. बांगलादेशचा संघ चौथ्या क्रमांकावरून सहाव्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या तर न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा संघ पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर तर इंग्लंडचा संघ सहाव्यावरून पाचव्या स्थानावर गेला आहे.
Wtc 2025 points table after ind vs ban first test#indvsbangladesh #BANvsIND#INDvBAN #TestCricket #Cricket #ViratKohli #RohitSharma #RavindraJadeja #ChepaukStadium #RavichandranAshwin #RishabhPant #ShubmanGill #siraj #Ashwin pic.twitter.com/wPH0QxTHPr
— RKP (@RaviKum19855167) September 22, 2024
अशी होती संपूर्ण सामन्याची परिस्थिती
चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 515 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला. रविचंद्रन अश्विनने कहर केला आणि सहा विकेट घेतल्या. कसोटीतील त्याची पाच विकेट घेण्याची 37वी ठरली आणि त्याने या बाबतीत महान शेन वॉर्नची बरोबरी केली. बांगलादेशकडून नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक 82 धावा केल्या.
बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांवर संपला
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 376 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांवर संपला. भारतीय संघाने दुसऱ्या डावात बांगलादेशला फॉलोऑन होऊ न देता 227 धावांची आघाडी घेऊन फलंदाजी केली. भारताने आपला दुसरा डाव 4 गडी बाद 287 धावांवर घोषित केला आणि एकूण 514 धावांची आघाडी घेतली.
बांगलादेशला 234/10 धावांवर ऑल आऊट केले
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 234/10 धावांवर ऑल आऊट केले. यादरम्यान रविचंद्रन अश्विनने 6 विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना 280 धावांनी जिंकला.