वडिलांचं खराब स्वास्थ पाहून बेन स्टोक्स झाला भावुक, वर्ष 2019 मध्ये कमावलेल्या यशाचा त्याग करण्यास तयार पण...
बेन स्टोक्स (Photo Credit: ICC/Twitter)

इंग्लंडच्या (England) विश्वचषक विजयाचा नायक बेन स्टोक्स (Ben Stokes) याने 2019 मध्ये जे वैयक्तिक यश मिळवले त्याचा ट्रेड करण्याचा आग्रह धरला आहे. इंग्लंडचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर आहे. याच इंग्लिश संघातील स्टोक्सचा देखील समावेश आहे, ज्याचे वडील दक्षिण आफ्रिकेत खूप आजारी आहेत. अशा परिस्थितीत इंग्लंडला पहिला विश्वचषक जिंकवून देणारा हा क्रिकेटपटू खूपच भावनिक आहे आणि वडिलांना सावरण्यासाठी 2019 मध्ये त्याने मिळवलेल्या प्रत्येक यशाचा त्याग करू शकतो. स्टोक्ससाठी वर्ष 2019 हे क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात उत्कृष्ट होते. स्टोक्सने जिथे इंग्लंडच्या पहिल्या विश्वचषक (World Cup) विजयात महत्वाची भूमिका बजावली, तर नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेत त्याने एकट्याने संघाला विजय मिळवून दिला होता. वर्ष 2019 बेन स्टोक्ससाठी वर्ष खूप चांगले जात होते. त्याला अनेक पुरस्कारही मिळाले होते, परंतु वर्षाचा अखेर स्टोक्ससाठी खराब सिद्ध झाला कारण त्याचे वडील गेड स्टोक्स आजारी पडले.

आणि आता वडिलांना बरं करण्यासाठी स्टोक्स 2019 मध्ये कमावलेल्या सर्व गोष्टींचा त्याग करण्यासाठी तयार आहेत, फक्त कोणीतरी आपल्या वडिलांना बरं करो. वडील गेड स्टोक्स जोहान्सबर्गमध्ये रूग्णालयात दाखल होण्याबाबत बेन स्टोक्स म्हणाले आहेत की, “सर्वात संस्मरणीय वर्ष2019आता माझ्यासाठी कठीण झाले आहे. मी यावर्षी बरेच टप्पे गाठले, परंतु आता माझे वडील रुग्णालयात दाखल आहेत. जर कोणी असे म्हटले की 2019 मध्ये आपण जे काही मिळवले ते मला द्या आणि बदल्यात मी तुमच्या वडिलांना बरं करीन, मग मी त्यासाठीही तयार आहे." स्टोक्सचे वडील त्याला खेळताना पाहण्यासाठी जोहान्सबर्गला पोहचले होते, पण अचानक त्यांचे स्वास्थ्य बिघडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, स्टोक्सने दक्षिण आफ्रिका दौर्‍याला 'शापित दौरा' म्हटले आहे कारण या दौऱ्यादरम्यान संघाचे 11 खेळाडू आजारी पडले आहेत. स्टोक्स मात्र आता न्यूलँडमध्ये पुन्हा खेळण्याची उत्सुक आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध इंग्लंडचा दुसरा टेस्ट 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे.