Ben Stokes ने राजस्थान रॉयल्ससाठी IPL 2021 चे उर्वरित सामने खेळण्यास दिला नकार, दुखापतीनंतर ‘या’ वेळी करणार मैदानावर कमबॅक
बेन स्टोक्स (Photo Credit: Instagram)

इंग्लंडचा प्रख्यात अष्टपैलू बेन स्टोक्सने (Ben Stokes) आपल्या बोटाच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झाल्यावर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परत येण्यास तंदुरुस्त असल्यानंतरही सध्या निलंबित इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे संकेत दिले आहे. आयपीएल 2021 च्या राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) पंजाब किंग्सविरुद्ध मोसमातील पहिल्या सामन्यात स्टोक्सच्या बोटाला फिल्डिंग दरम्यान फ्रॅक्चर झाले ज्यामुळे त्याला उर्वरित लीगमधून माघार घ्यावी लागली होती. आयपीएलच्या (IPL) बायो-बबलमध्ये कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे 29 सामन्यानंतर स्पर्धा स्थगित करण्यात आली आणि येथून अव्वल क्रिकेटपटू आयपीएलचे आयोजन झाल्यास उपलब्ध होणार नसल्याचं इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ECB) क्रिकेट संचालक अ‍ॅश्ले जाईल्स यांनी स्पष्ट केले आहे. (IPL 2021 Suspended: आयपीएल 14 चे उर्वरित सामने झाल्यास हे खेळाडू होणार ‘आऊट’, बोर्डाने केले मोठे विधान)

स्टोक्सने ‘डेली मिरर’ साठी आपल्या कॉलममध्ये लिहिले आहे की, “या स्पर्धेची पुनर्रचना होईल की नाही हे आम्हाला माहिती नाही, परंतु इंग्लंड खेळाडूंसाठी मोकळी जागा मिळवणे ईसीबीने म्हटल्याप्रमाणे कठीण होईल.” तथापि, तो पुढील आवृत्तीत परत येईल अशी खात्री इंग्लिश अष्टपैलूने व्यक्त केली. स्टोक्सने लिहिले की, “या वर्षानंतर मी भविष्यात पुन्हा एकदा संपूर्ण हंगामात खेळण्याची अपेक्षा करतो.” जखमी झाल्यावर तो पूर्णपणे निराश झाला असल्याचे स्टोक्सने म्हटले, परंतु सुरुवातीच्या संशयास्पद स्थितीनंतर शस्त्रक्रियेसाठी जाण्याचा निर्णय घेतला. “मी पुन्हा खेळताना परत येऊ शकतो याबद्दल मी तारीख सांगू शकत नाही, परंतु जोपर्यंत गोष्टी प्रगती होत आहेत आणि तोपर्यंत मी आशावादी आहे की पहिल्या तीन महिन्यांपूर्वी ते ठीक होईल आणि सात, आठ किंवा नऊ आठवडे लागतील. या गोष्टींसाठी किती वेळ लागेल हे आपणास कधीच ठाऊक नसते कारण हाडे बरे करणे आणि हाड मजबूत होण्याची तांत्रिक बाजूच नाही तर व्यावसायिक खेळ खेळण्याचा आत्मविश्वास असण्याचा एक मोठा मुद्दा आहे.”

दरम्यान, बेन स्टोक्स राजस्थान रॉयल्सकडून मागील तीन हांगाम खेळला असून यंदा तो फक्त एकच सामना खेळू शकला. शिवाय, दुखापतीमुळे स्टोक्स आता न्यूझीलंड विरुध्द्व होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांना देखील मुकणार आहे. तसेच भारताविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तो उपलब्ध असेल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.