
Glenn Maxwell Fined: पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज (PBKS vs CSK) यांच्यात काल सामना खेळवला गेला. ज्यात पंजाब किंग्जने हा सामना 18 धावांनी जिंकला आणि 2 गुण मिळवले. मात्र, सामन्यानंतर पंजाबचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला दंड ठोठावण्यात आला. बीसीसीआयने त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मॅक्सवेलला एक डिमेरिट पॉइंटही मिळाला आहे. ग्लेन मॅक्सवेलने कलम 2.2 (सामनादरम्यान फिक्स्चर आणि फिटिंग्जचा गैरवापर) अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा कबूल केला आणि मॅच रेफरीची शिक्षा देखील स्वीकारली आहे. Irfan Pathan Dropped from IPL 2025: स्टार खेळाडूबद्दल वक्तव्याचा इरफान पठाणचा 'तो' व्हिडीओ अखेर समोर; आयपीएलच्या कॉमेंट्रीमधून पत्ता कट झाल्याने चर्चेत
ग्लेन मॅक्सवेलची कामगिरी
ग्लेन मॅक्सवेलला आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत फार काही चांगले खेळता आलेले नाही. पंजाबने ज्या अपेक्षांसह त्याला त्यांच्या संघात समाविष्ट केले. त्या ऑस्ट्रेलियन स्टारला पूर्ण करता आल्या नाही. आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला आहे. त्याने 4 सामन्यांच्या 3 डावात 31 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 4 सामन्यांमध्ये 3 विकेट्स घेतल्या आहेत. आगामी सामन्यांमध्ये पंजाबला मॅक्सीकडून खूप अपेक्षा असतील.
पंजाबने सामना जिंकला
कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 219 धावा केल्या. पंजाबकडून प्रियांश आर्यने 42 चेंडूत 103 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय शशांक सिंगने 36 चेंडूत 52 धावा केल्या. तथापि, लक्ष्याचा पाठलाग करताना, सीएसकेला 20 षटकांत फक्त 201 धावा करता आल्या. सीएसकेकडून डेव्हॉन कॉनवेने 49 चेंडूत 69 धावा केल्या. पण त्या जिंकण्यासाठी पुरेशा नव्हत्या.