Coronavirus: भारत आणि दक्षिण अफ्रिका शेवटचे दोन क्रिकेट सामने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत, BCCI ने केली घोषणा
Coronavirus & Cricket | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

COVID-19: भारत आणि दक्षिण अफ्रिका (India and South Africa) यांच्यात अनुक्रमे लखनऊ आणि कोलकाता येथे खेळले जाणारे शेवटचे दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने हे प्रेक्षकांशिवाय खेळवले जाणार आहेत. देशभरात गडद होत असलेले कोरोना व्हायरस (Coronavirus) चे संकट विचारात घेऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआय (BCCI) ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत ही माहिती गुरुवारी (12 मार्च 2020) दिली. बीसीसीआयने ही माहिती देण्यापूर्वी केंद्री क्रीडा मंत्रालयाने म्हटले होते की, जर एखादी क्रीडा स्पर्धा अथवा सामना रद्द करता येत नसेल तर तो सामना कमी लोकांमध्ये अथवा प्रेक्षकांच्या गैरहजेरीत खेळवला जावा.

बीसीसीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत आणि दक्षिण अफ्रीका यांच्यात होत असलेल्या 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकेतील उर्वरीत दोन सामने हे बंद दरवाजा आड घेण्यात येतील. म्हणजेच प्रेक्षकांशिवाय हे सामने खेळवण्यात येतील. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर पसरणारा साथिचा रोग असे म्हटले आहे. कोरोना व्हायरसचे अधिकृत नाव हे सीओव्हीआयडी-19 (COVID 19) असे आहे. भारतात आतापर्यंत COVID 19 मळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, 70 पेक्षाही अधिक लोकांना त्याची बाधा झाली आहे. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरसचा भारतात पहिला बळी, कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथील वृद्धाचा मृत्यू)

बीसीसीआय ट्विट

जगभराचा विचार करता आतापर्यंत जगभरात सुमारे 128,827 लोक कोरोना व्हायरसमुळे संक्रमीत झाले आहेत. तर 113 देशांमधील सुमारे 4600 पेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बीसीसीआयने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, 'क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयासोबत झालेल्या चर्चेनंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्या खेळला जाणारा सामना प्रेक्षकांशिवाय खेळला जाईल.'