Team India (Photo Credit - X)

Team India Prize Money: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात (Champions Trophy 2025 Final) भारतीय क्रिकेट संघाने शानदार कामगिरी केली. टीम इंडियाने न्यूझीलंडला 4 गडी राखून पराभूत (India Beat New Zealand) करून विजेतेपद पटकावले. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियासाठी तिजोरी उघडली आहे. बीसीसीआयने संपूर्ण संघासाठी रोख बक्षीस जाहीर केले आहे. ही रक्कम खेळाडूंसह प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही दिली जाईल. बीसीसीआयने गुरुवारी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. (हे देखील वाचा: MI vs CSK: सूर्याच्या खांद्यावर कर्णधार पदाची जबाबदारी; हार्दिक-बुमराह बाहेर; पहा पहिल्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11)

बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे म्हटले आहे की, "भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाच्या विजयासाठी 58 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे." बक्षीस रक्कम खेळाडू तसेच प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी, निवड समितीच्या सदस्यांना दिली जाईल.

रोख बक्षीस कसे वाटले जाईल?

जर आपण खेळाडूंच्या पगाराकडे पाहिले तर ते ग्रेडनुसार दिले जाते. ए प्लस ग्रेडच्या खेळाडूंना सर्वाधिक पगार मिळतो. पण बक्षीस रकमेचा मुद्दा वेगळा आहे. बीसीसीआय खेळाडूंना रोख बक्षिसे कशी देईल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. पण सर्व खेळाडूंना समान पैसे दिले जाऊ शकतात.

अंतिम सामन्यात कशी होती भारताची कामगिरी

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्यानंतर, त्याने अंतिम सामन्यातही शानदार कामगिरी केली आणि न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 251 धावा केल्या. यादरम्यान, डॅरिल मिशेलने 63 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात, भारताने 49 षटकांत लक्ष्य गाठले. रोहितने अंतिम सामन्यात 76 धावांची शानदार खेळी केली. श्रेयस अय्यरने 48 धावांचे योगदान दिले.