
Mumbai Indian Probable Playing 11: इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. गेल्या हंगामातील खराब कामगिरी विसरून, मुंबई इंडियन्स यावेळी आपली ताकद दाखवण्यास उत्सुक आहेत. पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईचा आयपीएल 2025 मधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. पहिल्या सामन्यात, मुंबई त्यांच्या दोन स्टार खेळाडूंशिवाय मैदानात उतरेल. एका सामन्यात हार्दिक पांड्या सीएसकेविरुद्ध खेळताना दिसणार नाही.
हार्दिक-बुमराहशिवाय मुंबई इंडियन्स खेळणार
आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होईल. एमआयचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या सीएसकेविरुद्ध मैदानात खेळणार नाही. स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिकवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. हार्दिकसोबत जसप्रीत बुमराह देखील पहिल्या सामन्यात मुंबईच्या प्लेइंग 11 संघाचा भाग असणार नाही. बुमराह अजूनही दुखापतीतून सावरत आहे त्यामुळे तो सामन्यांमध्ये तो खेळताना दिसणार नाही.
एमआयचा फलंदाजीचा क्रम
पहिल्या सामन्यात मुंबईकडून रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन डावाची सुरुवात करताना दिसतील. तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा नंतर रॉबिन मिंज आणि नमन धीर हे मधल्या फळीत असतील. अर्जुन तेंडुलकर फलंदाजी आणि चेंडू दोन्हीतून योगदान देईल. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव मुंबईचा कर्णधार असेल.
ट्रेंट बोल्ट नेतृत्व करेल
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत, ट्रेंट बोल्ट मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसेल. दीपक चहर नवीन चेंडूने बोल्टला साथ देईल. फिरकी विभागाची जबाबदारी मुजीब उर रहमान आणि मिशेल सँटनर यांच्यावर असेल.
मुंबई इंडियन्स सीएसके विरुद्ध संभाव्य प्लेइंग 11
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिंज, नमन धीर, अर्जुन तेंडुलकर, मिशेल सँटनर, मुजीब उर रहमान, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट