IPL 2021 Update: स्थगित 'आयपीएल' संदर्भात BCCI आज अंतिम निर्णय घेण्याची शक्यता
IPL 2021 (Photo Credits: Instagram/iplt20)

कोविड-19 (Covid-19) संकटामुळे स्थगित झालेल्या आयपीएल 2021 (IPL 2021) संदर्भात बीसीसीआय आज अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीतील तीन आठवड्यांच्या काळात आयपीएल खेळवण्याची शक्यता आहे. आज (शनिवार, 29 मे) रोजी होणाऱ्या स्पेशल जनरल मिटिंगमध्ये (Special General Meeting) यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. (IPL 2021: युएई येथे आयपीएल 14 च्या दुसर्‍या लेगमधून हे 10 मोठे खेळाडू होतील टूर्नामेंट मधून गायब)

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर येणारे क्रिकेट मालिकांबद्दल चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच वर्षाच्या उत्तारार्धात सुरु होणाऱ्या आयसीसी टी 20 वर्ल्डकप आणि राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या क्रिकेट खेळाडूंचे मानधन यावर देखील चर्चा केली जाणार आहे. 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान आयपीएल सुरु होण्याची शक्यता असून युएई, अबुदाबी, दुबई आणि शारजाह मध्ये हे सामने खेळवण्यात येतील.

दरम्यान, टी 20 वर्ल्डकप 1 जूनपासून भारतात खेळवण्याचा बीसीसीआयचा मानस होता. परंतु, भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहता यावर पुर्नविचार करण्यासाठी बीसीसीआय आयसीसीआयला सांगू शकते. या जनरल मिटींगमध्ये बीबीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली देखील उपस्थित राहणार आहेत.

आयसीसी टी 20 वर्ल्डकप पूर्वी आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन असल्यामुळे इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभाग घेणार नाहीत, अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डचे संचालक Ashley Giles यांनी सांगितले. यामध्ये Jos Buttler, Ben Stokes, Jofra Archer, Jonny Bairstow, Sam Curran, Eoin Morgan, Moeen Ali यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू आपआपल्या संघासाठी खूप महत्त्वाचे असून त्यांची रिप्लेसमेंट करणे कठीण जाणार आहे.