दिनेश कार्तिक याला एक चूक पडली भारी; BCCI ने पाठवले नोटीस, जाणून घ्या काय आहे कारण
दिनेश कार्तिक (Photo Credit: AP/PTI0

टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्याविरूद्ध बीसीसीआयने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) संघ ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाच्या प्रचार कार्यक्रमात भाग घेतल्यामुळे बीसीसीआयने त्यांना ही नोटीस पाठवली आहे. ट्रिनबागोही बॉलिवूड स्टार शाहरुख खान याची टीम आहे. 34 वर्षीय कार्तिकला संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पहिले गेले होते. तसेच पोर्ट ऑफ स्पेनमधील सेंट किट्स आणि नेव्हिसविरुद्ध सीपीएलच्या सलामीचा सामना पाहायला कार्तिक पोहचला होता. कार्तिकला सात दिवसांच्या आत या नोटीसला उत्तर देण्याचे सांगितले आहेत. (विराट कोहली पाकिस्तानी संघात, पाकचा नापाक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, भारतीय चाहत्यांकडून सडेतोड प्रत्युत्तर)

बीसीसीआयच्या एका सूत्रांनी पीटीआयला सांगितले, 'होय, दिनेश कार्तिक यांना बीसीसीआयने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आम्हाला अशी फोटोज मिळाली आहेत जिथे कार्तिक ट्रिनबागोच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसला. कार्तिक टीम कोच ब्रेंडन मॅक्युलमसोबत ड्रेसिंग रूममध्ये होता. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी आपल्यास मध्यवर्ती करार का असावा हे सांगण्यास सांगणारी नोटीस बजावली आहे. त्याच बरोबर बोर्डच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे म्हटले आहे की कार्तिकने अद्याप मंडळाच्या केंद्रीय करारातील खेळाडूंच्या यादीमध्ये असूनही तसे करण्यापूर्वी त्यांची परवानगी घेतली पाहिजे होती.

ट्रिनबागो आणि कोलकाता या दोन्ही फ्रेंचायझीचे मालकी हक्क भारतीय अभिनेता शाहरुख खान यांच्याकडे आहेत. पण, बीसीसीआय विदेशी टी -20 लीगशी भारतीय खेळाडूंचा काही संबंध नसण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. तथापि, हे स्पष्ट झाले नाही की कार्तिक ड्रेसिंग रूममध्ये जाणे ही सामान्य गोष्ट होती की तो आयपीएलच्या पुढच्या सत्रासाठी रणनीती बनवण्यासाठी गेला होता. दरम्यान, प्रशासक समिती ही समस्या कशी हाताळते यावर कार्तिकचे भविष्य आता अवलंबून आहे. “सीओए त्याच्या स्पष्टीकरणाला कसे पाहते हे पाहणे बाकी आहे,” असे अधिकारी म्हणाले.