Team India New Coach: बीसीसीआयने (BCCI) वरिष्ठ पुरुष संघासाठी मुख्य प्रशिक्षक (Head Coach), फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. याव्यतिरिक्त, मंडळाने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये प्रमुख क्रीडा विज्ञानाच्या भूमिकेसाठी अर्जांसाठी जरी केले आहेत. मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजता निश्चित करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवीन प्रशिक्षकाबद्दल बरीच अटकळ लगावली जात होती, ज्यात असे मानले जात आहे की माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचे (Rahul Dravid) नाव आघाडीवर आहे. पीटीआयने यंदा आठवड्याच्या सुरुवातीला बीसीसीआयच्या ऑफरला "सहमती" दिल्याची बातमी दिल्यानंतर मुख्य प्रशिक्षक पदासाठी द्रविड एक मजबूत दावेदार म्हणून उदयास आले आहेत. (Ravi Shastri टीम इंडियाची साथ सोडण्याची शक्यता, T20 वर्ल्ड कपनंतर भारतीय क्रिकेट संघात होणार बदल; ‘हे’ 4 दिग्गज बनू शकतात प्रशिक्षक पदाचे दावेदार)
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी, बीसीसीआयने खालील अटी निश्चित केल्या आहेत...
1. किमान 30 कसोटी सामने किंवा 50 एकदिवसीय सामने खेळले पाहिजेत.
2. कमीतकमी 3 वर्षांच्या कालावधीसाठी असोसिएट सदस्य/आयपीएल टीम किंवा समकक्ष आंतरराष्ट्रीय लीग/प्रथम श्रेणी संघ/राष्ट्रीय अ संघाचे किमान 2 वर्षांच्या कालावधीसाठी पूर्ण सदस्य चाचणी खेळणाऱ्या राष्ट्राचे मुख्य प्रशिक्षक
3. बीसीसीआय लेव्हल 3 प्रमाणन किंवा समतुल्य असावे.'
4. नियुक्तीच्या वेळी किमान 60 वर्षे वय
🚨 NEWS 🚨: BCCI invites Job Applications for Team India (Senior Men) and NCA
More Details 🔽
— BCCI (@BCCI) October 17, 2021
आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रवि शास्त्री आणि त्यांच्या टीमचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. म्हणजेच न्यूझीलंड मालिकेपूर्वीच टीम इंडियाला नवीन प्रशिक्षक मिळेल. इतकंच नाही तर आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यादरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह यांनी दुबईतच राहुल द्रविडशी चर्चा केली होती. आणि द्रविडने यासाठी होकार दिल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळल्या द्रविडने 2012 मध्ये भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर 2016 मध्ये अंडर-19 आणि इंडिया अ संघाचे ते प्रशिक्षक बनले. त्याच वर्षी त्यांच्या कार्यकाळात संघ अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचा उपविजेता ठरला होता. त्यानंतर 2018 मध्ये द्रविडच्या प्रशिक्षणात अंडर-19 संघ वर्ल्ड कप चॅम्पियन बनला. यानंतर 2019 मध्ये, त्यांची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेट ऑपरेशन प्रमुख म्हणून निवड झाली.