पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी भारतामध्ये (India) 2021 वर्ल्ड टी-20 आणि 2023 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होता व्हावं यासाठी लेखी आश्वासन मागितलं आहे. वासिम यांनी विश्वकरंडक खेळायला आल्यावर भारत सरकारकडून व्हिसासंबंधित कोणतेही प्रश्न उद्भवणार नाहीत, असे लेखी आश्वासन मंडळाने आयसीसीकडे मागितल्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पीसीबीकडून ‘दहशतवादी हल्ला न होण्याची हमी मागितली आहे. IANS शी बोलताना एकाबीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की, "आयसीसीचा नियम स्पष्ट सांगतो कोणताही सामना किंवा स्पर्धेत सरकारचा हस्तक्षेप असू नये, हीच गोष्ट क्रिकेट बोर्डांनाही लागू होते आणि त्यांनी सरकार चालविण्यात हस्तक्षेप करू नये." भारत आणि पाकिस्तानमधील तणाव काहीकेल्या कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीये. इतकी वर्ष राजकीय संबंध ताणल्याचा फटका क्रिकेटलाही बसला आहे. मागील 8 वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळली गेलेली नाही. दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धेत आमने-सामने येतात. (PCB ने BCCI कडून 'या' गोष्टीसाठी मागितले लेखी आश्वासन, पुढच्या वर्षी दोन वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येणार पाकिस्तान क्रिकेट टीम!)
“"पीसीबी असे लेखी आश्वासन देऊ शकेल की पाकिस्तान सरकारकडून याची खात्री करुन घेतली जाईल की पाकिस्तानातून कोणताही अवैध घुसखोरी होणार नाही किंवा युद्धबंदीचे कोणतेही उल्लंघन झाले नाही किंवा पाकिस्तानमध्ये उद्भवणार्या भारतीय मातीवर दहशतवादी कृत्य केले जात नाही किंवा पुलवामा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही? आयसीसीने हा आदेश दिला आहे की खेळाच्या कारभारात सरकारांचे हस्तक्षेप होऊ नयेत आणि हे स्पष्ट केले जाईल की एखादे क्रीडा बोर्ड सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू शकत नाही. आयसीसीमध्ये नेहमी भारताविरोधी भूमिका घेणाऱ्यांचे एजंट म्हणून काम करणं पाकिस्तान बोर्डाने थांबवावं," अशा शब्दात अधिकाऱ्याने आपली बाजू मांडली.
यापूर्वी, 'क्रिकेट बाज' या यूट्यूब वाहिनीवरील मुलाखतीत वसीम खान म्हणाले की, “2021 आणि 2023 मध्ये होणाऱ्या महत्वाच्या स्पर्धांचं यजमानपद भारताकडे आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तान संघाला कोणत्याही समस्येला सामोरं जावं लागणार नाही यासाठी आम्हाला लिखीत आश्वासन हवं आहे. बीसीसीआयने आम्हाला हमी द्यावी अशी मागणी आम्ही आयसीसीकडेही करणार आहोत. वर्ल्ड कप खेळण्यासाठी येणाऱ्या पाकिस्तान संघाचा व्हिसा क्लिअर झाला पाहिजे.”