PCB ने BCCI कडून 'या' गोष्टीसाठी मागितले लेखी आश्वासन, पुढच्या वर्षी दोन वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येणार पाकिस्तान क्रिकेट टीम!
भारत-पाकिस्तान (Photo Credits: Getty Images)

भारतात (India) दोन विश्वचषक (World Cup) खेळण्यासाठी व्हिसा मिळण्यास पाकिस्तानी टीमला अडचण होणार नाही अशी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसीला (ICC) बीसीसीआयकडून (BCCI) लेखी आश्वासन देण्यास सांगितले आहे. भारतात 2021 टी-20 आणि 2023 वनडे वर्ल्ड कपचे आयोजन होणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार पीसीबीने आयसीसीला बीसीसीआयकडून पुढील काही महिन्यांत त्यांच्या सरकारकडून आश्वासन मिळवून देण्यास सांगितले आहे. "2021 आणि 2023 मध्ये आयसीसी विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहेत याकडे आम्ही लक्ष देत आहोत आणि आम्हाला व्हिसा आणि क्लिअरन्स मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही याबाबत बीसीसीआयकडून लेखी आश्वासन देण्यास आयसीसीला आधीच सांगितले आहे," पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान (Wasim Khan) यांनी युट्यूब क्रिकेट बाझ चॅनलवरील मुलाखतीत सांगितले. (Asia Cup 2020: आशिया चषक होणारच! पूर्व निर्धारित वेळेनुसार श्रीलंका किंवा युएईमध्ये होणार स्पर्धा, अफवांवर PCB CEO वसीम खानचे स्पष्टीकरण)

आयसीसीचे कार्यकारी मंडळ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलिया किंवा भारत करणार की नाही याचा पुढील बैठकीत निर्णय घेतील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. यंदा ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टी-20 आयोजित होण्याची शक्यता नसल्याचे खान म्हणाले. "2021 मध्ये वर्ल्ड टी-20 आयोजित केला जाईल तेव्हा ऑस्ट्रेलिया किंवा भारत त्याचे आयोजन केले जाईल. 2021 मध्ये वर्ल्ड टी-20 स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे," असे ते म्हणाले. खान म्हणाले की, आयसीसीच्या सदस्यांना वाटले की वर्ल्ड टी-20 ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत 2021 किंवा 2022 मध्ये आयोजित केला जावा.

ते म्हणाले की, आयसीसी स्पर्धांसाठी पाकिस्तानला भारतात जायचे आहे. खेळाडू व अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत पूर्ण आश्वासन मिळाल्यानंतर पाकिस्तानी टीम आयसीसीच्या स्पर्धेसाठी भारतात जाईल. अलीकडच्या काळात अनेक पाकिस्तान क्रीडा पथकांना भारत सरकारने खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही याकडे खान यांनी लक्ष वेधले. “म्हणूनच आम्ही हमी मागितली आहे. पण अखेरीस हा आयसीसीचा कार्यक्रम आहे आणि आम्ही या संपूर्ण आयसीसी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कराराचा संपूर्ण सदस्य आणि स्वाक्षरीकर्ता म्हणून याची खात्री करण्याचीत्यांची जबाबदारी आहे."