आयपीएल (Photo Credit: Twitter)

IPL 2020 Playoffs, Final Schedule: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 13वा हंगाम शिगेला पोहोचला आहे. आयपीएल (IPL) 2020 प्लेऑफ खेळणाऱ्या चारही संघांनी क्वालिफाय केलेले नाहीत. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल 2020 प्ले ऑफ (IPL PlayOffs) आणि फायनलचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बीसीसीआयनेही (BCCI) महिला टी-20 चॅलेंज (Women's T20 Challenge) किंवा महिला आयपीएलचे वेळापत्रक (Women's IPL Schedule) जाहीर केले आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 7 नोव्हेंबर रोजी दुबई येथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता पहिला क्वालिफायर खेळला जाईल. हा सामना आयपीएल 2020 च्या गुणतालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या संघांमध्ये खेळला जाईल. हा सामना जिंकणारा संघ थेट आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी अबू धाबी येथे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघात एलीमिनेटर सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजला आयोजित केला जाईल. (IPL 2020 Play Off Scenario: आयपीएल प्ले ऑफसाठी कडक लढत; जाणून घ्या कोण कसं पटकावणार अंतिम-4 चं तिकीट)

सामना जिंकणारा संघ दुसर्‍या क्वालिफायरमध्ये पहिला क्वालिफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाचा सामना करेल, तर एलिमिनेटर सामना गमावलेल्या संघाचा प्रवास आयपीएल 2020 मध्ये संपुष्टात येईल. दुसरा क्वालिफायर सामना 8 नोव्हेंबरला अबु धाबीच्या मैदानावर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल. आणि अंतिम सामना 10 नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर क्वालिफायर वनचा विजेता आणि क्वालिफायर 2 च्या विजयी संघादरम्यान भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजेपासून खेळला जाईल.

दुसरीकडे, महिला टी-20 चॅलेंज 2020 किंवा महिला आयपीएलचे आयोजन शारजाह येथे केले जाईल. मागील वर्षीप्रमाणे यंदाही तीन संघ सहभागी होतील, ज्यात सुपरनोवाज, वेलोसिटी आणि ट्रेलब्लेझरचा समावेश आहे. महिला टी -20 चॅलेंजची सुरुवात 4 नोव्हेंबरपासून सुपरनोव्हास आणि वेलोसिटी यांच्यातील सामन्यासह होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. दुसरा सामना 5नोव्हेंबर रोजी वेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर संघ यांच्यात दुपारी साडेतीन वाजेपासून खेळला जाईल. त्यानंतर, ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोव्हास यांच्यातील तिसरा आणि शेवटचा लीग सामना संध्याकाळी 7:30 वाजता 7 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. तर पॉइंट टेबलमधील अव्वल असलेले दोन संघ थेट अंतिम फेरीपर्यंत पोहोचतील. महिला आयपीएलचा अंतिम सामना शारजाह येथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजला खेळला जाईल. हा सामना 9 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.