भारतीय महिला क्रिकेट टीम( Photo Credit: X/@BCCIWomen)

BCCI Central Contract 2025 List Players: बीसीसीआयने टीम इंडियाच्या 1खेळाडूंना वार्षिक केंद्रीय करार देण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ही यादी तीन श्रेणींमध्ये विभागली आहे. हा करार 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. बीसीसीआयने यंदाच्या करारात कर्णधार हरमनप्रीत व्यतिरिक्त स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांना ग्रेड ए श्रेणीमध्ये स्थान दिले आहे. तर 4 खेळाडूंना ब श्रेणीत स्थान मिळाले आहे. या 4 खेळाडूंमध्ये रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि शफाली वर्मा यांचा समावेश आहे.

याशिवाय, यास्तिका भाटिया, राधा यादव, श्रेयंका पाटील, तीतस साधू, अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, उमा छेत्री, स्नेहा राणा आणि पूजा वस्त्रकर यांना ग्रेड सी मध्ये स्थान देण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्रेड ए मध्ये समाविष्ट असलेल्या हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी 50 लाख रुपये मिळतील. तर, रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि शेफाली वर्मा यांना प्रत्येकी 30 लाख रुपये दिले जातील. याशिवाय, ग्रेड सी मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व 9 खेळाडूंना दरवर्षी प्रत्येकी 10 लाख रुपये मिळतील.

'या' खेळाडूंना झटका!

या वर्षी मेघना सिंग, देविका वैद्य, शब्बिनेनी मेघना, अंजली सरवाणी आणि हरलीन देओल यांना केंद्रीय करार मिळण्यापासून वंचित राहावे लागले.