India Domestic Cricket Schedule: 20 सप्टेंबरपासून सुरु होणार भारताचा देशांतर्गत क्रिकेट हंगाम, जाणून घ्या कधी होईल रणजी ट्रॉफीची सुरुवात
सरफराज खान (Photo Credits: Twitter)

India Domestic Cricket Schedule: भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) राज्य क्रिकेट संस्थांनासाठी सुधारित वेळापत्रक जारी केले असून यानुसार पुढील वर्षी 5 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान 2021-22 हंगामासाठी रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy) सुधारित नियोजन केले जाणार आहे. रणजी ट्रॉफी गेल्या हंगामात कोविड-19 महामारीमुळे आणि 38 संघांसाठी विस्तारित बायो-बबल असल्याने लॉजिस्टिक अडथळ्यांमुळे आयोजित केली गेली नव्हती. तसेच इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेनंतर होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली करंडकाने (Mushtaq Ali Trophy) 27 ऑक्टोबरपासून वरिष्ठ पुरुष क्रिकेटची सुरुवात होईल. विजय हजारे करंडक 50 षटकांच्या स्पर्धा 1 ते 29 डिसेंबर दरम्यान खेळली जाईल. मागील वर्षांप्रमाणे या वेळी सय्यद मुश्ताक अली टी-20, रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे (Vijay Hazare) वनडेमध्ये एकरूपता असेल.

प्रत्येक एलिट गटात सहा संघांचा समावेश असेल. आठ संघांचा एक प्लेट गट असेल. पाच एलिट गटांतील विजेता थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल. प्रत्येक एलिट गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ आणि प्लेट गटातील विजेते तीन प्री-क्वार्टर फायनल खेळतील आणि तीन विजेते क्वार्टर-फायनल लाइन-अप फेरीत प्रवेश करतील. दुसरीकडे, ज्येष्ठ महिला त्यांची पहिली स्पर्धा - राष्ट्रीय वनडे दिवस - 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान खेळतील. हंगाम 20 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या महिला आणि पुरुषांच्या अंडर-19 वनडे (विनू मांकड) सह सुरु होईल आणि त्यानंतर अनुक्रमे 25 आणि 26 ऑक्टोबरपासून महिला व पुरुष दोघांसाठी अंडर-19 चॅलेंजर ट्रॉफी आयोजित केली जाईल. अंडर-25 (राज्य A) वनडे 9 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान आयोजित केले जाईल तर सीके नायडू करंडक (मागील वर्षीच्या अंडर-23 मधील अंडर-25) 6 जानेवारीपासून सुरु होईल. सीके नायडूसाठी प्रत्येकी सहा संघांचे पाच एलिट गट आणि सात संघांचा एक प्लेट गट असेल.

वेळापत्रक

अंडर-19 महिला (वनडे): 20 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर

विनू मंकड करंडक (पुरुष अंडर-19 वनडे): 20 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर

पुरुष चॅलेंजर करंडक (अंडर -19): 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर

महिला चॅलेंजर करंडक (अंडर -19): 25 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर

सय्यद मुश्ताक अली टी-20 करंडक: 27 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर

ज्येष्ठ महिला वनडे: 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर

पुरुष राज्य वनडे: 9 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर

विजय हजारे करंडक (पुरुष वनडे): 1 डिसेंबर ते 29 डिसेंबर

वरिष्ठ महिला चॅलेंजर करंडक: 26 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर

रणजी करंडक: 5 जानेवारी ते 20 मार्च

कूच बिहार करंडक (पुरुष अंडर-19): 21 नोव्हेंबर ते 2 फेब्रुवारी

कर्नल सीके नायडू ट्रॉफी (पुरुष 4-दिवस, अंडर -25): 6 जानेवारी ते 2 एप्रिल

वरिष्ठ महिला टी 20: 20 फेब्रुवारी ते 23 मार्च

विजय मर्चंट करंडक (पुरुष अंडर -16): नोव्हेंबर-डिसेंबर