
आंतरराष्ट्रीय दौर्यादरम्यान साथीदार सोबत असण्याच्या काळाची मर्यादा वाढवण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयला केलेल्या मागाणीचा त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. . बीसीसीआयच्या नियमांनुसार, क्रिकेटर्सच्या साथीदार त्यांच्यासोबत केवळ 3 आठवडे राहू शकत होत्या. मात्र आता या नियमामध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे.
BCCI च्या नियमांमध्ये बदल
टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, कमिटी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनने आता क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दहा दिवसात क्रिकेटरसोबत त्यांचे साथीदार नसतील परंतू त्यापुढे संपूर्ण टूरदरम्यान त्यांची साथीदार सोबतीला राहण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यामुळे भारतीय संघामध्ये आनंदाचं वातावरण आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघानेही 2015 पासून अशाच प्रकारचे नियम केले आहेत.
भारतीय संघासोबत त्यांच्या पत्नींचं असणं, टूरदरम्यान भटकणं, सेल्फी पोस्ट करणं यावरून अनेक भारतीय क्रिकेटर्स सोशलमीडियावर ट्रोल झाले आहेत. सुरूवातीच्या टप्प्यात स्ट्रेडियममध्ये अनुष्का शर्मा असल्यामुळे विराटचा खेळ बिघडल्याचंही नेटकर्यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे. वेस्ट इंडिजसोबतचा सामना संपल्यानंतर लवकरच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर जाणार आहे.