Bangladesh Women's National Cricket Team vs Ireland Women's National Cricket Team, 2nd T20I Match Scorecard Update: बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 7 डिसेंबर रोजी सिल्हेट येथील सिल्हेट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर दुपारी दीड वाजल्यापासून खेळवला जाईल. पहिल्या टी-20 सामन्यात आयर्लंड संघाने बांगलादेशचा 12 धावांनी पराभव केला. यासह आयरिश संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत निगार सुलताना बांगलादेशचे नेतृत्व करत आहे. तर, आयर्लंडची कमान गॅबी लुईसच्या हाती आहे. (हेही वाचा - vs Ireland Women, 2nd T20I Live Streaming In India: बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यात आज खेळला जाणार दुसरा टी-20 सामना, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह)
पाहा पोस्ट -
Bangladesh Women vs Ireland Women | 2nd T20i
Bangladesh need 135 runs to win
Match Details 👉: https://t.co/rNs3hOR04k#BCB #BANWvIREW #HomeSeries #T20 #womenscricket pic.twitter.com/gKygyL32bk
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 7, 2024
दरम्यान, दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आयर्लंडचा कर्णधार गॅबी लुईसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर आयरिश संघाची सुरुवात उत्कृष्ट झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी रचली. आयर्लंडने 20 षटकांत 5 गडी गमावून 134 धावा केल्या. आयर्लंडसाठी लॉरा डेलेनीने 35 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान लॉरा डेलेनीने 25 चेंडूत चार चौकार मारले. लॉरा डेलेनीशिवाय ओरला प्रेंडरगास्टने 32 धावा केल्या.
दुसरीकडे, नाहिदा अख्तरने बांगलादेश संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. बांगलादेशकडून नाहिदा अख्तरने सर्वाधिक दोन बळी घेतले. नाहिदा अख्तरशिवाय फहिमा खातून, जहाँआरा आलम आणि जन्नतुल फिरदुस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी बांगलादेश संघाला 20 षटकात 135 धावा करायच्या आहेत. हा सामना जिंकून बांगलादेश संघाला मालिकेत पुनरागमन करायचे आहे. तर, आयरिश संघाला दुसरा टी-२० जिंकून मालिका जिंकायची आहे.