Bangladesh Team (Photo Credit - Twitter)

BAN vs AFG Test Series 2023: बांगलादेश क्रिकेट संघाने शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध (BNG vs AFG) खेळला गेलेला एकमेव कसोटी सामना जिंकून इतिहास रचला. मीरपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात चौथ्या दिवशीच बांगलादेशने विजय मिळवला. तत्पूर्वी तिसऱ्या दिवशी बांगलादेशने आपला दुसरा डाव 425 धावांवर घोषित करत अफगाणिस्तान संघाला 662 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात 115 धावांत गारद झाला. तर पहिल्या डावात संघाने केवळ 146 धावा केल्या. बांगलादेश संघाने हा सामना 546 धावांनी जिंकला, जो कसोटी सामन्यातील धावांच्या बाबतीत तिसरा सर्वात मोठा विजय आहे. त्याचबरोबर हा 21व्या शतकातील सर्वात मोठा विजय आहे.

फलंदाजांसोबतच गोलंदाजांचाही मोलाचा वाटा

यापूर्वी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 492 धावांनी पराभव केला होता. बांगलादेशच्या या विजयात फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही मोलाचा वाटा उचलला. बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने अफगाणिस्तानला फॉलोऑन न होऊ देत दुसऱ्या डावात स्वत: खेळण्याचा निर्णय घेतला होता. जर त्याने हे केले नसते तर कदाचित हा विक्रम झाला नसता आणि बांगलादेशचा संघ हा सामना एका डावाने जिंकू शकला असता. (हे देखील वाचा: BAN vs AFG Test Series 2023: बांगलादेशच्या फलंदाजाचा डबल धमाका, दोन्ही डावात शतक झळकावून इतिहास रचला)

कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय (धावांच्या बाबतीत)

  • इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 675 धावांनी पराभव केला, 1928
  • ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 562 धावांनी पराभव केला, 1934
  • बांगलादेशने अफगाणिस्तानचा 546 धावांनी पराभव केला, 2023
  • ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 530 धावांनी पराभव केला, 1911
  • दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 492 धावांनी पराभव केला, 2018

नजमुल हसन शांतोनेही इतिहास रचला

नजमुल हसन शांतोनेही या सामन्याच्या दोन्ही डावात 146 आणि 124 धावा करत शतके झळकावून इतिहास रचला. कसोटी क्रिकेटच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा तो बांगलादेशचा दुसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी मोमिनुल हकने ही कामगिरी केली होती. याशिवाय या सामन्यात बांगलादेशकडून शरीफुल इस्लाम, इबादत हुसेन आणि तस्किन अहमद यांनी शानदार गोलंदाजी केली. तस्किनने दोन्ही डावात 4 (0,4), इबादतने 5 (4,1) आणि शॉरीफुलने 5 (2,3) बळी घेतले.