एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) लीग टप्प्यातील शेवटचा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडिया आणि नेदरलँड्स (IND vs NED) यांच्यात हा सामना होत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय आघाडीच्या फलंदाजांनी योग्य ठरविला. कारण प्रथम फलंदाजी करत भारताने नेदरलँड्ससमोर 411 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. यादरम्यान, भारतीय टॉप ऑर्डरने असा पराक्रम केला जो वर्ल्ड कपमध्ये यापूर्वी कधीही झाला नव्हता. (हे देखील वाचा: IND vs NED सामन्यात Shubman Gill ने लगावला 95 मीटरचा गगन चुंबी उंच षटकार, पाहा व्हिडिओ)
विश्वचषकात प्रथमच घडले असे
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी नेदरलँड्सविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली. सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि शुभमन गिलने संघाला शानदार सुरुवात करून दिली. यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरनेही आपला फॉर्म कायम ठेवला. केएल राहुलनेही धावांची लय कमी होऊ दिली नाही. या सर्व फलंदाजांनी 50 हून अधिक धावा केल्या. विश्वचषकाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एका संघाच्या पहिल्या 5 फलंदाजांनी एकाच सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विश्वचषकात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते.
Iyer - 128* (94).
KL Rahul - 102 (64).
Rohit - 61 (54).
Gill - 51 (32).
Kohli - 51 (56).
India post 410/4 - the highest ever World Cup score this year. What a batting effort led by KL and Iyer. pic.twitter.com/VADC4Q12mT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 12, 2023
नेदरलँड्सच्या गोलंदाजांना धू धू धूतला...
या सामन्यात शुभमन गिलने 32 चेंडूत 51 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले. तर रोहित शर्माने 54 चेंडूत 61 धावा केल्या. यादरम्यान त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. विराट कोहलीने 56 चेंडूत 51 धावांची खेळी केली. यादरम्यान विराटने 5 चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचवेळी श्रेयस अय्यरने 94 चेंडूत 128 धावा करुन नाबाद राहिला तर केएल राहुलने 64 चेंडूत 102 धावा केल्या.
टीम इंडिया इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर
यावेळी वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला रोखणे केवळ अवघडच नाही तर अशक्य वाटत आहे. भारतीय संघाने शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. याआधी टीम इंडियाने 2003 वर्ल्ड कपमध्ये सलग 8 सामने जिंकले होते. तेव्हा टीम इंडियाची जादू सौरव गांगुलीच्या हातात होती. अशा स्थितीत टीम इंडियाचा आता हा विक्रम मोडण्याकडे लक्ष लागले आहे.