बांगलादेशने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवत पाकिस्तानात इतिहास रचला आहे. बांगलादेशने या विजयासह पाकिस्तानचा 2-0 अशा फरकाने पराभव करत क्लिन स्वीप केले आहे. पाकिस्तानने बांगलादेशला विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या आहेत. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी आणखी 143 धावांची गरज होती. (हेही वाचा - Pakistan vs Bangladesh, 2nd Test Day 5: पाकिस्तानविरुद्ध इतिहास रचण्यासाठी बांगलादेश सज्ज; जिंकण्यासाठी पाचव्या दिवशी 143 धावांची गरज)

पाहा पोस्ट -

बांगलादेशचा हा पाकिस्तानमध्ये पहिलाच मालिका विजय ठरला. तर पाकिस्तानला घरात मालिका गमवावी लागल्याने त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.  सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. त्यानंतर पाकिस्तानने पहिल्या डावात 85.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 274 धावा केल्या. बांगलादेशची प्रत्युत्तरात बिकट स्थिती झाली होती.

पाहा पोस्ट -

बांगलादेशने 26 धावांवर 6 विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर लिटन दास आणि मेहदी हसन मिराज या दोघांनी सातव्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे बांगलादेशला पहिल्या डावात 262 धावांपर्यंत मजल मारता आली. लिटन दासने 138 धावा केल्या होता. लिंटन दासच्या या  खेळीसाठीच त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा देण्यात आला.