रावळपिंडी येथे पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. पहिला दिवस पावसामुळे वाया गेला होता. या सामन्यातील चौथ्या दिवशी पाकिस्तानने बांगलादेशला विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं. बांगलादेशने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 7 षटकांत 42 धावा केल्या आहेत.  बांगलादेशच्या हातात 10 विकेट असल्याने त्यांचा विजय सोप्पा मानला जात आहे. बांगलादेशकडून झाकीर हुसेनने 23 चेंडूत  31 धावा तर शादाब इस्लाम  9 धावांवर खेळत आहेत.  (हेही वाचा - Pakistan vs Bangladesh, 2nd Test Day 4 Stumps Scorecard: दुसऱ्या कसोटीवर बांगलादेशची पकड मजबूत, विजयासाठी पाचव्या दिवशी 143 धावांची गरज)

बांगलादेशने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर 10 विकेट्सने विजय मिळवला होता. बांगलादेशने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती.

दुसऱ्या डावात पाकिस्तानने फक्त 172 धावा केल्या. दुसऱ्या डावात मोहम्मद रिझवान आणि अघा सलमान वगळता एकही फलंदाजी चांगली कामगिरी करू शकला नाही. मोहम्मद रिझवानने 43, तर अघा सलमानने 47 धावा केल्या आहेत. तर बांगलादेशकडून हसन महमुदने 5, नहिद राणाने 4 आणि तस्किन अहमदने 1 विकेट घेतली. पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद 274 धावा केल्या. बांगलादेशची प्रत्युत्तरात 6 बाद 26 अशी नाजूक स्थिती झाली होती. मात्र लिटन दास आणि मेहदी हसन मिराज याने तसं होऊ दिलं नाही.या दोघांनी खऱ्या अर्थाने मॅच फिरवली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी बांगलादेशच्या डावातील टर्निंग पॉइंट ठरला. बांगलादेशला पहिल्या डावात 78.4 ओव्हरमध्ये 262 धावा करता आल्या.