
IND vs SA T20 Series 2023: भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (Team India South Africa Tour) रविवार 10 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या प्रदीर्घ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-20 आंतरराष्ट्रीय, तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 10 डिसेंबर रोजी डर्बनच्या किंग्समीड स्टेडियमवर खेळवला जाईल. टीम इंडियाने अलीकडेच पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 4-1 ने पराभव करून आपली ताकद दाखवली. (हे देखील वाचा: IND vs SA Series 2023: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका पाहण्यासाठी रात्रीची झोप उडणार, जाणून घ्या किती वाजता सुरु होणार सामना)
पावसामुळे खराब होऊ शकते पहिल्या टी-20ची मजा!
ऑस्ट्रेलियानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पराभूत करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी येत आहे. पहिल्या टी-20 मध्ये पावसामुळे सामन्याची मजा खराब होऊ शकते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना रविवारी 10 डिसेंबर रोजी डर्बनमध्ये खेळला जाणार आहे, त्याच दिवशी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 10 डिसेंबर रोजी डर्बनमध्ये दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पहिला टी-20 सामना वाहून गेला तर...
रविवारी 10 डिसेंबर रोजी डर्बनमध्ये पावसाची बातमी कळताच चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की पहिला टी-20 सामना कोणत्याही अडथळ्याशिवाय खेळवला जाणार की तो रद्द होणार? वास्तविक, गेल्या अनेक दिवसांपासून डर्बनमध्ये पाऊस पडत आहे. हवामान अहवालानुसार, रविवारी 10 डिसेंबर रोजी सामन्याच्या दिवशी पावसाची 70 टक्के शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 18 किलोमीटर राहील.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका
पहिला टी-20 - 10 डिसेंबर 2023, किंग्समीड, डर्बन, रात्री 9.30 वाजता
दुसरा टी-20 - 12 डिसेंबर 2023, सेंट जॉर्ज पार्क, रात्री 9.30 वाजता
तिसरा टी-20 - 14 डिसेंबर 2023, न्यू वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, रात्री 9.30 वाजता
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुनील, रवींद्र जडेजा. कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.