पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) बांगलादेशविरुद्ध (BNG) 40 चेंडूत 55 धावा करत आपला चमकदार फॉर्म कायम ठेवला. या खेळीसह बाबरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा पार केला. सर्वात कमी डावात 11,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत बाबरने आशियाई फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकले आहे. या सामन्यापूर्वी बाबरच्या खात्यात एकूण 10,947 धावा होत्या. बाबरने 3122 कसोटी धावा आणि 4664 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत, तर टी-20 (T20) आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये त्याच्या खात्यात 3216 धावा आहेत.
याआधी बाबर आझमने सर्वात जलद 10,000 आंतरराष्ट्रीय धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकले होते. बाबर आझमने 251 डावात ही कामगिरी केली आहे, तर विराट कोहलीने 261 डावांमध्ये 11 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. पाकिस्तानने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला. (हे देखील वाचा: ICC T20 Ranking: सूर्यकुमारची टी-20 क्रमवारीत चमक कायम, टॉप-10 मध्ये एकमेव भारतीय फलंदाज)
मोहम्मद रिझवानने 69 धावांची खेळी खेळली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत 6 बाद 173 धावा केल्या. त्याचवेळी, पाकिस्तानने 19.5 षटकांत तीन विकेट गमावून 177 धावा करून सामना जिंकला.