Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND s AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) मालिकेतील चौथा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताचा 184 धावांनी पराभव केला आहे. यासह यजमान संघानी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. (हे देखील वाचा: Pat Cummins New Record: रोहित शर्माची विकेट घेऊन पॅट कमिन्सने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार)

दरम्यान  ऑस्ट्रेलियन मीडियाकडून भारतीय खेळाडूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. आधी विराट कोहलीवर निशाणा साधला गेला आणि आता रोहित शर्माच्या निशाण्यावर आला आहे. रोहित शर्माच्या खराब कर्णधारावर निशाणा साधण्यात आला आहे. 'द वेस्ट ऑस्ट्रेलियन' वृत्तपत्राने रोहित शर्माला 'कॅप्टन क्राय बेबी' म्हणत त्याची खिल्ली उडवली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन मीडियाने विराट कोहलीला 'जोकर' म्हटले होते.

पाहा पोस्ट -

रोहित शर्माला 'कॅप्टन क्राय बेबी' का म्हटले गेले?

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने तीन झेल सोडले होते, त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने गारवा गमावला होता. तीन झेल सुटल्यानंतर रोहितने जैस्वालला मैदानावरच खडसावले. जैस्वालने उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन आणि पॅट कमिन्सचे झेल सोडले होते. यानंतर रोहित शर्मा निशाण्यावर आला.