Australia Beat England, 5th ODI Match Video Highlights: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील (ODI मालिका) पाचवा आणि निर्णायक सामना 29 सप्टेंबर रोजी खेळला गेला. ब्रिस्टल येथील काऊंटी ग्राउंड स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला गेला. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने DLS नियमांच्या आधारे इंग्लंडचा 49 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने मालिका 3-2 ने जिंकली. (हेही वाचा: England vs Australia 5th ODI Match Scorecard: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या सामन्यात पावसाची बॅटींग; 310 धावांचा पाठलाग करताना कांगारूचे 20.4 षटकांत 165/2)
आपल्या उत्कृष्ट खेळीदरम्यान बेन डकेटने 91 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकार ठोकले. बेन डकेटशिवाय कर्णधार हॅरी ब्रूकने सात षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने झटपट 72 धावा केल्या. स्टार गोलंदाज आरोन हार्डीने ऑस्ट्रेलियन संघाला पहिले यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. ट्रॅव्हिस हेडशिवाय ग्लेन मॅक्सवेल, ॲरॉन हार्डी आणि ॲडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
ENG विरुद्ध AUS सामन्याचे हायलाइट्स येथे पहा: