ICC Champions Trophy 2025: ऑस्ट्रेलियाने 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर (Australia Squad for Champions Trophy 2025) केला आहे. सोमवारी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. पॅट कमिन्स - जो सध्या पितृत्व रजेवर आहे - तो संघात परतला आहे. तो या मोठ्या स्पर्धेत कांगारू संघाचे नेतृत्व करेल. यासोबतच जोश हेझलवूडचे नावही या यादीत आहे. तो दुखापतीतून सावरत आहे. हे दोन्ही खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाचा भाग नाहीत. (हे देखील वाचा: South Africa Squad for Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेनं जाहीर केला घातक संघ! अँरिक नोर्टजे आणि लुंगी एनगिडीचे पुनरागमन)
डेव्हिड वॉर्नरच्या जागी 'या' खेळाडूची निवड
आपल्या दमदार गोलंदाजीनं होबार्ट हरिकेन्सला बीबीएल 14 च्या अंतिम फेरीत नेणाऱ्या नॅथन एलिसलाही संधी मिळाली. तर अष्टपैलू कॅमेरून ग्रीन पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे संघाबाहेर आहे. डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर त्याच्या जागी मॅथ्यू शॉर्टची निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे, बिग बॅश लीग आणि अलिकडच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर जेक फ्रेझर मॅकगर्कला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
Our preliminary squad for the 2025 @ICC #ChampionsTrophy is here 🔥 pic.twitter.com/LK8T2wZwDr
— Cricket Australia (@CricketAus) January 13, 2025
ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाचे सामने
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी
28 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, अॅरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिश, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, अॅडम झंपा