Team India (Photo Credit - X)

IND vs AUS, Champions Trophy 2025 Semi Final Records: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs AUS) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) पहिला उपांत्य सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाने गट टप्प्यात शानदार कामगिरी केली आणि त्यांचे सर्व सामने जिंकले. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, ऑस्ट्रेलियाची कमान स्टीव्हन स्मिथच्या खांद्यावर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्टीव स्मिथने 73 धावांची सर्वाधिक खेळी केली तर भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या.

स्टीव स्मिथची कर्णधारपदी खेळी

प्रथम फलंदाजी करुन ऑस्ट्रेलियाने 49.3 षटकांत सर्वबाद होण्यापूर्वी 264 धावा केल्या. स्मिथने कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 73 धावा केल्या. अ‍ॅलेक्स कॅरीने 57 चेंडूत 61 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने 39 धावांचे योगदान दिले. बेन द्वारशुइसने 19 धावांची खेळी केली. 29 धावा करून लाबुशेन बाद झाला.

 मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट्स

टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी व्यतिरिक्त, वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 50 षटकांत 265 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित करायचे आहे.