IND vs AUS (Photo Credit - X)

Australian Men's National Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND s AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) मालिकेतील चौथा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. 3 सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आज खेळाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 311/6 होती. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक 140 धावा केल्या आहे. तर भारताकडून बुमराह-जडेजाने 3-3 विकेट घेतल्या आहे.

स्टीव्हन स्मिथ आणि कॅमिन्स यांची 112 धावांची भागीदारी

पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 4 फलंदाजांच्या अर्धशतक आणि स्टीवन स्मिथच्या 140 धावांच्या जोरावर 474 धावा केल्या. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर कॉन्स्टास 60 आणि उस्मान ख्वाजा 57 धावा करून बाद झाला. मार्नस लॅबुशेन 72 धावा करून बाद झाला. त्यानंतर आज म्हणजे दुसऱ्या दिवशी स्टीव्हन स्मिथ पॅट कॅमिन्स यांनी 112 धावांची भागीदारी रचली. पॅट कॅमिन्स 40 आणि स्मिथ 140 धावा करुन बाद झाला.

जसप्रीत बुमराहने घेतल्या 4 विकेट

भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने 4 तर रवींद्र जडेजाने 3 बळी घेतले. याशिवाय आकाश दीप 2 आणि वॉशिंग्टन सुंदरनेही एक विकेट घेण्यात यश मिळवले.