Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 1st T20I Match 2024 Scorecard: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील (T20 Series) पहिला सामना आज म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना ब्रिस्बेनमधील (Brisbane) द गाबा (The Gabba) येथे खेळला गेला. पहिल्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पावसामुळे षटके कमी करण्यात आली आणि सामना प्रत्येकी सात षटकांचा खेळवण्यात आला. ( हेही वाचा - Australia vs Pakistan, 1st T20I: ग्लेन मॅक्सवेलच्या शानदार 43 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्टेलियाचे पाकिस्तान समोर 7 षटकांत 94 धावांचे आव्हान )
पाहा पोस्ट -
Australia get the win by 29 runs in this rain reduced match! A 1-0 series lead.
LIVE #AUSvPAK WRAP
👉https://t.co/yuBExX8w42👈 pic.twitter.com/wc8tHukLIT
— 🏏Flashscore Cricket (@FlashCric) November 14, 2024
दरम्यान, पहिल्या T20 सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 35 धावांवर संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सात षटकांत चार गडी गमावून 93 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने शानदार फलंदाजी करत अवघ्या 19 चेंडूत पाच आणि तीन षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलशिवाय मार्कस स्टॉइनिसने नाबाद 21 धावा केल्या.
नसीम शाहने पाकिस्तान संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. पाकिस्तानकडून अब्बास आफ्रिदीने सर्वाधिक दोन बळी घेतले. अब्बास आफ्रिदीशिवाय नसीम शाह आणि हरिस रौफ यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानला सात षटकांत 94 धावा करायच्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि त्यांचे तीनपैकी सहा फलंदाज अवघ्या 24 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. पाकिस्तान संघाला सात षटकांत नऊ गडी गमावून अवघ्या 64 धावा करता आल्या. पाकिस्तानकडून अब्बास आफ्रिदीने सर्वाधिक नाबाद 20 धावा केल्या. अब्बास आफ्रिदीशिवाय हसिबुल्ला खानने 12 धावा केल्या.
स्पेन्सर जॉन्सनने ऑस्ट्रेलियन संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाकडून झेवियर बार्टलेट आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. झेवियर बार्टलेट आणि नॅथन एलिस यांच्याशिवाय ॲडम झाम्पाने दोन बळी घेतले. मालिकेतील दुसरा सामना शनिवारी म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी येथे दुपारी 1.30 वाजल्यापासून खेळवला जाईल.