Travis Head (Photo Credit - X)

England National Cricket Team vs Australia National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी, 19 सप्टेंबर रोजी ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 3 गडी राखून पराभव केला. यासह पाहुण्या संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकावले. ट्रॅव्हिस हेडने 129 चेंडूत नाबाद 154 धावा केल्या. ज्यात 20 चौकार आणि 5 षटकार मारले होते. याशिवाय मार्नस लॅबुशेनने 77 धावा केल्या. त्याचबरोबर या सामन्यात इंग्लंडची गोलंदाजी काही खास नव्हती. मात्र, यजमान संघाला दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करायला आवडेल.

बेन डकेटची सर्वाधिक 95 धावांची खेळी 

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 48 धावा जोडल्या. इंग्लंडचा संपूर्ण संघ 49.4 षटकांत 315 धावा करून ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून सलामीवीर बेन डकेटने सर्वाधिक 95 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान बेन डकेटने 11 चौकार मारले.

व्हिडिओवर क्लिककरुन पाहा हायलाइट्स

स्ट्रेलियाकडून ॲडम झाम्पा आणि मार्नस लॅबुशेन यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. ॲडम झाम्पा आणि मार्नस लॅबुशेन यांच्याशिवाय ट्रॅव्हिस हेडने दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले, मॅथ्यू शॉर्ट आणि बेन द्वारशुइसने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला 50 षटकात 316 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची निराशाजनक सुरुवात झाली आणि अवघ्या 20 धावांवर संघाला पहिला मोठा फटका कर्णधार मिचेल मार्शच्या रूपाने बसला. यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथने डावाची धुरा सांभाळली. ऑस्ट्रेलियन संघाने 44 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.

ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 154 नाबाद धावांची खेळी खेळली. ट्रॅव्हिस हेडशिवाय मार्नस लॅबुशेनने नाबाद 77 धावा केल्या. इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल आणि मॅथ्यू पॉट्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या मालिकेतील दुसरा सामना 21 सप्टेंबर रोजी हेडिंग्ले, लीड्स येथे दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल.