Sri Lanka National Cricket Team vs Australia National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 14 फेब्रुवारी रोजी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा 49 धावांनी पराभव केला. यासह यजमान संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता श्रीलंकेचा संघ दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून मालिका बरोबरीत आणण्याच्या इराद्याने प्रवेश करेल. पुन्हा एकदा दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळेल.
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कधी खेळला जाईल?
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवार, 14 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 10.00 वाजता कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. तर टॉसची वेळ त्यापूर्वी अर्धा तास असेल. (हे देखील वाचा: NZ vs PAK Final ODI Tri-Series 2025 Live Streaming: तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड आणि पाकिस्तान आमनेसामने, कुठे पाहणार लाइव्ह सामना? घ्या जाणून)
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कुठे पाहणार?
भारतात, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर थेट प्रक्षेपित केली जाईल. तर लाईव्ह स्ट्रीमिंग सोनीलिव्ह अॅप, फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत, चाहते येथून दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
दोन्ही संघांचे खेळाडू
श्रीलंका: पथुम निस्सांका, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडिस, असिता फर्नांडो, लाहिरू कुमारा, चरिथ असलंका (कर्णधार), अविष्का फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो, झेनिथ लियानागे, दुनिथ वेलागे, वानिंदू हसरंगा, मोहम्मद शिराज, इशान मलिंगा, महेश थीकशाना, जेफ्री वँडरसे, निशान मदुष्का.
ऑस्ट्रेलिया: स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, कूपर कॉनोली, शॉन अॅबॉट, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्पेन्सर जॉन्सन, आरोन हार्डी, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, अॅडम झांपा.