आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. आज विश्वचषकमधील दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया (Australia) आणि यजमान इंग्लंड (England) संघ आमने-सामने असतील. या दोन संघातील सामना एजबस्टन च्या मैदानावर खेळाला जाईल. आजच्या सामान्य टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरोन फिंच (Aaron Finch) याने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजच्या मॅचच्या शेवटी फायनलमध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध कोणता संघ असेल ते स्पष्ट होतील. याआधी विश्वचषक साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाचा पराभव केला होता आणि आजच्या या हाईवोल्टेज सेमीफायनल मॅचमध्ये देखील आपला तोच फॉर्म कायम ठेवण्याच्या उद्देशाने उतरतील. दरम्यान, आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून प्लेयिंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याला दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध सामन्यात दुखापत झाल्याने त्याच्या जागी पीटर हैंड्सकॉम्ब (Peter Handscomb) याला संघात स्थान देण्यात आले आहे. तर, दुसरकडे इंग्लंडच्या संघात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

दरम्यान, जर आजचा सामना देखील पावसामुळे रद्द करण्यात आला तर तो दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी खेळण्यात येईल. रेकॉर्डमध्ये पाच वेळा वर्ल्ड कप जिंकलेली ऑस्ट्रेलियन टीम यंदाच्या टूर्नांमेंटमध्ये प्रबळ दावेदारांपैकी मानली जाते.