Asia Cup 2021: श्रीलंका क्रिकेटचे (Sri Lanka Cricket) मुख्य कार्यकारी अॅश्ले डी सिल्वा (Ashley de Silva) यांनी पुष्टी केली आहे की आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेच्या 2021 आवृत्तीचे आयोजन रद्द करण्यात आले आहे. अनेक सहभागी देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या कोविड-19 संकटाच्या (COVID-19 Crisis) पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा सर्वकाही थांबले आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका (Sri Lanka), बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि मलेशिया यांच्यात ही स्पर्धा होणार होती. यापूर्वी दुसऱ्या कोविड लाटेमुळे इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) 14 वे संस्करण आणि पाकिस्तान सुपर लीगचे (Pakistan Super League) 6 वे सत्र अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले होते. श्रीलंका क्रिकेटचे चीफ एक्झिक्युटिव्ह डी सिल्वा यांनी आशियाई स्पर्धेच्या भवितव्याबाबत पत्रकारांशी बोलताना खुलासा केला की कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका आशिया चषक स्पर्धा आयोजित करणार नाही. (Asia Cup 2021: यंदा आशिया चषक आयोजित करण्यावर PCB चा संकोच, पहा काय आहे नक्की कारण)
“सध्याच्या परिस्थितीमुळे यावर्षी जूनमध्ये स्पर्धा खेळणे शक्य होणार नाही,” न्यूज एजन्सी AFP ने डी सिल्वाचे म्हणणे उद्धृत केले. कोविड-19 महामारीमुळे बर्याच राष्ट्रांनी या प्रदेशातून उड्डणांवरूनही बंदी घातली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संघांचे पुढील दोन वर्षांचे वेळापत्रक आधीच निश्चित असल्यामुळे श्रीलंका क्रिकेट चीफ एक्झिक्युटिव्हने ठामपणे सांगितले आहे की 2023 आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर आशिया चषकचे आयोजन केले जाईल. दरम्यान, टीम इंडियाने अंतिम सामन्यात बांग्लादेशचा 3 गडी राखून पराभव केला होता आणि 2018 मधील एशिया कपची मागील आवृत्ती जिंकली होती. लक्षात घेण्यासारखे आहे की युएईने दुबई आणि अबू धाबी येथे 50 ओव्हरच्या स्पर्धेचे आयोजन केले होते तेव्हा अखेरचा एशिया कप 2018 मध्ये खेळला होता. डी सिलिव्ह यांनी असेही म्हटले की एशियन क्रिकेट कौन्सिल लवकरच एलिट स्पर्धा रद्द करण्याबाबत औपचारिक घोषणा करेल. श्रीलंकन क्रिकेट टीम सध्या बांग्लादेश दौऱ्यावर असून तिथे ते तीन सामन्यांची वनडे आंतरराष्ट्रीय मालिका खेळतील.
Sri Lanka Cricket chief executive Ashley de Silva "Due to the prevailing situation, it will not be possible to play the Asia Cup Twenty20 cricket tournament in June this year" #Cricket
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) May 19, 2021
दुसरीकडे, 2020 ची आवृत्ती यंदाच्या वर्षी आयोजित करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. सुरुवातीला पाकिस्तानने त्याचे आयोजन केले होते. तथापि, भारत आणि पाकिस्तान यांच्यात राजकीय तणावामुळे स्पर्धा श्रीलंकेत हलवण्यात आली. दरम्यान, कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे श्रीलंकेच्या सरकारने आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावर 10 दिवसांची बंदी घातली आहे.