आशियाई क्रिकेट चषक 2020 (Asia Cricket Cup 2020) सामन्याचे यजमानपद पाकिस्तानकडे (Pakistan) सुपूर्त करण्याचा निर्णय घोषित झाल्यापासून टीम इंडिया (Team India) यामध्ये सहभागी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सिंगापूर (Singapore) येथे आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्यतः भारत विरुद्ध पाकिस्तान अशी क्रिकेट मॅच जरी असली तरी जगभरातील क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचलेली असते. मात्र हे दोन्ही देश एकमेकांच्या वैयक्तिक प्रीमियर लीगमध्ये कधीही सहभाग घेत नाहीत. यामुळे गतविजेता भारत या स्पर्धेत सहभागी होणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी सिंगापूरला झालेल्या बैठकीत हजर होते. या बैठकीत भारत-पाक यांच्यामधले राजकीय संबंध न सुधारल्यास स्पर्धा तिसऱ्याच ठिकाणी आयोजित करण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे.याशिवाय या बैठकीत 2022 आशियाई खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करावा याबद्दलही चर्चा करण्यात आली. ICC World Cup 2019 Team India Time Table: जाणून घ्या कधी, केव्हा आणि कुठल्या टीमसोबत भिडणार टीम विराटचे वीर
एकीकडे भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातील परस्पर तणावाच्या परिस्थितीमुळे 2008 नंतर भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन कोणताही क्रिकेटचा सामना खेळलेला नाही. तर आशियाई चषकाचा इतिहास पाहता 2018 मध्ये युएईमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत बांगलादेशवर मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे आता 2020 मध्ये होणाऱ्या सामन्यात त्यामुळे येत्या काळात परस्पर वाद मिटवून टीम इंडिया पाकिस्तानममध्ये सामना खेळणार की या वेळेस आशिया कप सारख्या मोठ्या स्पर्धेतून माघार घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.