भारतात लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) मायदेशात आणि मायदेशात भारताविरुद्ध (India) कसोटी मालिकेत पिछाडीवर आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर अॅशेस मालिकेत 0-2 अशा पिछाडीवर पडल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तो जगातील नंबर 1 कसोटी फलंदाज असला तरी यामुळे संघाच्या कामगिरीवर काही फरक पडला नाही. माजी महान खेळाडूंनी रूटच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि अॅशेसमध्ये 4-0 असा पराभवाचा परिणाम त्याच्या कर्णधारपदावर होण्याची शक्यता आहे. अॅशेस मालिकेतील (Ashes Series) दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडविरुद्ध 275 धावांनी मोठा विजय नोंदवला. इंग्लंडच्या सलग दुसऱ्या पराभवापूर्वी, ऑस्ट्रेलियन महान इयन चॅपलने रूटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (Ashes 2021: पिंक-बॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दबदबा कायम, इंग्लंडला 275 धावांनी लोळवून मालिकेत 2-0 अशी घेतली आघाडी)
नाणेफेक जिंकल्यानंतर आणि जॅक लीचची निवड न केल्यावर गब्बा येथील बॉलिंग खेळपट्टीवर पहिले फलंदाजी करण्याचा निर्णयामुळे त्याच्या निर्णयक्षमतेवर, संघाची निवड आणि गोलंदाजीच्या योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रूटने देखील कबूल केले की यामुळे तो कर्णधारपद गमावू शकतो. कारणही अगदी स्पष्ट आहे. रूटच्या नेतृत्वात इंग्लंडला भारत दौऱ्यावर पराभव पत्कराव लागला, तर घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा आणि मायदेशात भारताकडून 1-2 ने संघ पिछाडीवर पडला आहे. तसेच अॅशेसमध्ये त्यांच्यावर पराभवाचे संकट ओढावले आहे. काही शंकास्पद निर्णयांमध्ये लीच वगळणे आणि योग्य सलामी जोडी निश्चित न करणे अशा निर्णयांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी महान खेळाडू चॅपेल यांनीही रूटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्याला खराब कर्णधार म्हटले.
दरम्यान रूटच्या नेतृत्वात इंग्लंडने आता शेवटच्या 12 पैकी 11 सामने गमावले असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. याव्यतिरिक्त आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलवरील इंग्लंडची स्थिती सध्या खराब दिसत आहे, ज्यामध्ये ICC च्या स्लो ओव्हर-रेटसाठी दंडानंतर संघ सातव्या स्थानावर घसरला आहे. अॅशेसपूर्वी रूट म्हणाला होता की, कसोटी मालिका त्याच्या कर्णधारपदाचा निर्णय घेईल. 27 विजयांसह रूट हा इंग्लंडचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. परिणामी कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी ECB उर्वरित सामन्यांवर बारीक लक्ष ठेवून अपेक्षित आहे.