ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) सध्या आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. इंग्लंड विरुद्ध अॅशेस (Ashes) मालिकेत स्मिथने उत्कृष्ट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगची धुरा सांभाळली आहे. स्मिथने या मालिकेतील 5 डावांमध्ये 134.2 च्या सरासरीने 671 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 द्विशतक, 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियासध्या 2-1 ने आघाडीवर आहे. आणि आजपासून पाचव्या आणि अंतिम मालिकेला सुरूवात होणार आहे. केनिंग्टनच्या द ओव्हल मैदानात हा सामना खेळाला जाईल. यंदाच्या मालिकेत स्मिथने आपल्या खेळीने सर्वांना अचंबित केले आहे. आणि 12 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या सामन्यात स्मिथला एक मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. (Ashes 2019: स्टीव्ह स्मिथ याला हूट करणाऱ्या इंग्लंड चाहत्यांची ICC ने उडवली खिल्ली, 'कर्मा' म्हणत केले 'हे' मजेदार Tweet)
मालिकेत चार सामन्यांत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्यापासून स्मिथ फक्त 159 धावा दूर आहे. या यादीमध्ये सध्या वेस्ट इंडीजचा दिग्गज विव्ह रिचर्ड्स आहे. रिचर्ड्सने 1976 मध्ये इंग्लंडविरुद्ध एका मालिकेत 829 धावा केल्या होत्या. या यादीत दुसरे नाव आहे माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे. गावस्कर यांनी 1970-71 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध चार सामन्यात 774 धावा केल्या होत्या. ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात स्मिथ अप्रतिम फॉर्ममध्ये होता. त्याने पहिल्या डावात 211 धावा फटकावल्या आणि दुसऱ्या डावात 92 धावांची खेळी केली. याच्याशिवाय, स्मिथला ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार डॉन ब्रॅडमन यांचा 89 वर्ष पूर्वीचा देखील रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. स्मिथने सध्याच्या मालिकेत आजवर सर्वाधिक 671 धावा केल्या आहे. पण, 1930 च्या मालिकेत, ब्रॅडमनने 974 धावा फटकावल्या, जे एका कसोटी मालिकेतल्या क्रिकेटपटूने आजवरच्या सर्वात जास्त धावा आहेत. ओव्हल येथे दोन डावांमध्ये स्मिथने आणखी 304 धावा केल्या, तर तो ब्रॅडमनच्या 89 वर्षांच्या विक्रम मोडत टेस्टमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड कायम करू शकतो.
शिवाय, तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) याला रिकी पॉन्टिंग आणि ग्रेग चॅपल जे करू शकले नाही असा रेकॉर्ड करायची संधी आहे. इंग्लंडविरुद्ध मालिका 3-1 ने जिंकत पेन कर्णधाऱ्यांच्या एलिट लिस्टमध्ये सहभागी होऊ शकतो. स्टीव्ह वॉ (Steve Waugh) याने 18 वर्षांपूर्वी 4-1 ने यश मिळविल्यापासून ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने असे यश संपादन केले नाही. इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात विजय मिळवत पेन वॉ नंतर दुसरा कर्णधार बानू शकतो ज्याने टेस्ट मालिकेत 3-1 असे यश संपादन केले आहेत.