Ashes 2019: चौथ्या टेस्टसाठी मिचेल स्टार्क आणि स्टीव्ह स्मिथ यांचे पुनरागमन, उस्मान ख्वाजा आऊट
स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: @ICC/Twitter)

ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्कृष्ट सरासरी सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याला अ‍ॅशेस (Ashes) मालिकेच्या चौथ्या सामन्यासाठी  संघातून वगळण्यात आले आहेत. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाने आपलय स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याचा समावेश केला आहे. बुधवारी पासून मॅनचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू होणाऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने 12-सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आतापर्यंत खेळण्यात आलेल्या 3 सामन्यात खराब कामगिरीमुळे ख्वाजाला चौथ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. ख्वाजाने मागील तीन सामन्यांच्या 6 डावात 20.33 च्या सरासरीने केवळ 122 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिनसन यालाही विश्रांती देण्यात आली आहे. (विराट कोहली याला झटका, ICC Test क्रमवारीत स्टीव्ह स्मिथ याने मिळवले अव्वल स्थान)

दुसर्‍या कसोटी सामन्यात गळ्याला चेंडू लागल्यामुळे स्मिथला दुखापत झाली होती. ज्यामुळे तो तिसरा सामना खेळू शकला नाही. असा अंदाज वर्तविला जात होता की स्मिथ चौथा सामनादेखील खेळू शकणार नाही, पण आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याला संघात सहभागी करण्यात आले आहेत. त्याच्या जागी, तिसर्‍या कसोटीत मार्नस लाबुशेन याला स्थान देण्यात आले होते. स्मिथच्या अनुपस्थितीत लबूशेनने तीन डावांमध्ये सलग तीन अर्धशतक झळकावले. ज्यासह त्याने चौथ्या कसोटीत संघात फलंदाज म्हणून स्थान मिळवले.

मिशेल स्टार्क (Mitchell Starc) आणि पीटर सिडल (Peter Siddle) दोघांना 12 खेळाडूंमध्ये स्थान दिले आहेत पण, यापैकी फक्त एक गोलंदाज प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. अ‍ॅशेस मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी 1-1 सामने जिंकले आहेत तर एक सामना अनिर्णित राहिला होता. आता चौथी टेस्ट जिंकण्यासाठी दोन्ही संघांमध्ये कडक स्पर्धा होऊ शकते, यामुळे चौथा सामना रोमांचक होईल यात शंका नाही.

चौथ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा 12 सदस्यीय संघ पुढीलप्रमाणेः

डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, टिम पेन (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मार्कस हॅरिस, मॅथ्यू वेड, मार्नस लॅब्युचेन, मिशेल स्टार्क, पीटर सिडल, नॅथन लियॉन, जोश हेजलवुड आणि पॅट कमिन्स.