Ashes 2019: अवघ्या 777 रुपयात विकली जातेय डेविड वॉर्नर याची बॅट, स्टुअर्ट ब्रॉडच्या हाती बाद होण्यासाठी इंग्लंडच्या बर्मी आर्मीने केली टिंगल
स्टुअर्ट ब्रॉड आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: @englandcricket/Instagram and @cricketcomau/Twitter)

अ‍ॅशेस (Ashes) मालिकेच्या पाचव्या आणि शेवटचा कसोटी सामना सध्या इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात द ओव्हल (The Oval) मैदानात खेळला जात आहे. या सामन्यात यजमान संघाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य दिले आहे. या संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) शेवटच्या डावात काहीतरी आश्चर्यकारक करेल अशी अपेक्षा केली होती, परंतु पुन्हा एकदा त्याने निराशा केली आणि 11 धावा करुन स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याचा बळी बनला. यंदाच्या अ‍ॅशेसमध्ये वॉर्नर आपल्या फलंदाजीने छाप सोडण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. यावेळी पाच सामन्यांच्या 10 डावांपैकी तो इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजचा बळी ठरला. विशेषतः इंग्लंडचा ब्रॉड या संपूर्ण कसोटी मालिकेत त्याच्यासाठी सर्वात मोठा धोका ठरला. 10 डावांपैकी सात वेळा वॉर्नरला ब्रॉडने बाद केले. तर तीन वेळा जोफ्रा आर्चर याने बाद केले. (Ashes 2019: आकाश चोप्रा याने DRS वरून टिम पेन याच्यावर साधला निशाणा, एमएस धोनी कडून क्लास घेण्याचा दिला सल्ला)

वॉर्नरला बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या बर्मी आर्मीने त्याची खिल्ली उडविली आणि एक फोटो शेअर केले ज्यामध्ये वॉर्नरची बॅट 777 रुपयांनी विकली जात आहे असे दिसत आहे. या फोटोमध्ये लिहिले आहे की, "'कधीही न वापरलेली - अ‍ॅशेस 2019 च्या दौऱ्यानंतर डेव्हिड वॉर्नरची बॅट."

अ‍ॅशेस2019 मध्ये ब्रॉडने वॉर्नरला 7 वेळा बाद केले, परंतु ब्रॉडच्या कसोटी कारकीर्दीत बहुतेक वेळा एखाद्या फलंदाजाला बाद करायचे असेल तर त्याने वॉर्नरला सर्वाधिक वेळा माघारी धाडले आहेत. ब्रॉडने वॉर्नरला त्याच्या कसोटी कारकीर्दीत सर्वाधिक 12 वेळा बाद केले आहेत. यानंतर 11 वेळा त्याने मायकेल क्लार्क याला बाद केले. तसेच एबी डिव्हिलियर्स आणि रॉस टेलर यांना 10-10 वेळा बाद केले. शिवाय, वॉर्नरने यंदाच्या मालिकेत दहा डावांमध्ये 9.50 च्या अत्यंत खराब सरासरीने केवळ 95 धावा केल्या. यावेळी त्याची सर्वोत्तम धावसंख्या अवघ्या 61 धावांची होती. तर, त्याने दहा डावांमध्ये केवळ दोनदा दुहेरी आकडा गाठला.