[Poll ID="null" title="undefined"]टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समीक्षक आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने इंग्लंडच्या द ओव्हल (The Oval) मैदानात सुरु असलेल्या अॅशेस (Ashes) मालिकेच्या पाचव्या आणि अंतिम टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा (Australia) कर्णधार टिम पेन (Tim Paine) याच्या दोन चुकीच्या निर्णयावरून त्याला ट्रोल केले. शिवाय, डीआरएस सिस्टिममध्ये माहीर भाताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्याकडून क्लास घेण्याचा सल्ला देखील देऊन टाकला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या द ओव्हल मैदानात अॅशेसची पाचवी आणि अंतिम टेस्ट मॅच सुरु आहे. या मॅचच्या तिसऱ्या दिवशी पेनकडून डीआरएसच्या संदर्भात दोन चुकीचे निर्णय घेण्यात आले. त्याने जो डेन्ली आणि जोस बटलर यांच्या विरुद्ध डीआरएसचा वापर केला नाही. पण, रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की जर डीआरएस घेतले असते तर दोन्ही खेळाडू बाद झाले असते. (Ashes Series 2019: स्टीव्ह स्मिथ याने घेतलेला शानदार झेल पाहून व्हाल थक्क, पाहा व्हिडिओ)
डेन्ली 54 धावांवर तर बटलर 19 धावांवर असताना पेनने संधी गमावली. परिणामे, डेन्लीने 94 तर बटलरने 47 धावा केल्या. पेनच्या या दोन चुकीच्या निर्णयाबाबत ट्विट करत आकाशने लिहिले की, "धोनीला कॉल कर. तो विद्यार्थी घेण्यास तयार आहे की नाही ते पहा 🤣😂 धोनी रिव्यू सिस्टिम."
Give a call to Dhoni. See if he’s ready to take students 🤣😂 Dhoni Review System. https://t.co/kcfuH1S6tQ
— Aakash Chopra (@cricketaakash) September 15, 2019
दरम्यान, या मालिकेत हे पहिल्यांदा नाही जेव्हा पेनचा रिव्यूबाबतचा निर्णय चुकला आहे. याआधी हेडिंगले येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टेट्स मॅचमध्ये त्याच्या डीआरएसबद्दलच्या चुकीच्या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियाला सामना गमवावा लागला होता. पाचव्या मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर पेन म्हणाला की, "याबाबत माझ्याकडून चुका झाल्या. मला नाही माहिती कुठे आणि का. आमच्यासाठी हे वाईट स्वप्नासारखे आहे, आम्ही याला समजण्याबाबत चूक केली."