SRH vs PBKS (Phto Credit - X)

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 27 वा सामना 12 एप्रिल (शनिवार) रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज (SRH vs PBKS) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली, सनरायझर्स हैदराबादने सलग चार सामने गमावले आहेत आणि आता संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघाने पाच पैकी चार सामने जिंकले आहेत आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध फक्त एक सामना गमावून पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड (SRH vs PBKS Head To Head Record In IPL)

आयपीएलच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात एकूण 23 सामने खेळले गेले आहेत. या काळात, सनरायझर्स हैदराबादने वरचढ कामगिरी केली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने 16 सामने जिंकले आहेत. तर, पंजाब किंग्जने फक्त सात सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले होते. या काळात सनरायझर्स हैदराबादने दोन्ही सामने जिंकले होते. पंजाब किंग्ज हा सामना जिंकून त्यांची आकडेवारी सुधारू इच्छितात.

सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

अभिषेक शर्मा: सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने गेल्या 10 सामन्यांमध्ये 431 धावा केल्या आहेत. या काळात अभिषेक शर्माने 179.32 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माची आक्रमक फलंदाजी एसआरएचसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

हेनरिक क्लासेन: सनरायझर्स हैदराबादचा घातक फलंदाज हेनरिक क्लासेनने 347 धावा केल्या आहेत. या काळात, हेनरिक क्लासेनने 61च्या सरासरीने धावा केल्या आहेत. जर हेनरिक क्लासेन स्थिरावला तर तो विरोधी गोलंदाजांसाठी मोठ्या समस्या निर्माण करू शकतो.

मोहम्मद शमी: एसआरएचचा घातक फलंदाज मोहम्मद शमीने आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात, मोहम्मद शमीने 7.44 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे. डेथ ओव्हर्समध्ये मोहम्मद शमीची गोलंदाजी विरोधी संघांचे कंबरडे मोडू शकते.

श्रेयस अय्यर: पंजाब किंग्जचा कर्णधार आणि स्फोटक फलंदाज श्रेयस अय्यरने गेल्या 10 सामन्यांमध्ये 421 धावा केल्या आहेत. यादरम्यान, श्रेयस अय्यरने 183.32 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरची आक्रमक फलंदाजी पंजाब किंग्जसाठी गेम चेंजर ठरू शकते.

ग्लेन मॅक्सवेल: पंजाब किंग्जचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने 286 धावा केल्या आहेत. या काळात ग्लेन मॅक्सवेलने 61 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. जर ग्लेन मॅक्सवेल स्थिरावला तर तो विरोधी संघाच्या गोलंदाजांसाठी मोठ्या समस्या निर्माण करू शकतो.

युजवेंद्र चहल: पंजाब किंग्जचा घातक गोलंदाज युजवेंद्र चहलने गेल्या आठ सामन्यांमध्ये आतापर्यंत 16 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात, युजवेंद्र चहलने 7.44 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे. मधल्या षटकांमध्ये युजवेंद्र चहलची गोलंदाजी विरोधी संघांचे कंबरडे मोडू शकते.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, कामिंडू मेंडिस, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद शमी.

पंजाब किंग्ज : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि युझवेंद्र चहल.