MI vs DC (Photo Credit - X)

DC vs MI, TATA IPL 2025 29th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 29 वा सामना आज म्हणजेच 13 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (DC vs MI) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या हंगामात, दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, मुंबईची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. (हे देखील वाचा: Most Runs & Wickets In IPL 2025: निकोलस पूरन ऑरेंज कॅपचा मानकरी, नूर अहमदने जिंकली पर्पल कॅप; येथे पहा टॉप-5 फलंदाज आणि गोलंदाजांची यादी)

हेड टू हेड रेकॉर्ड (DC vs MI Head To Head Record In IPL)

आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एकूण 35 सामने खेळले गेले आहेत. या काळात, मुंबई इंडियन्सने वरचढ कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स संघाने 19 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्सने 16 सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले होते. या काळात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता.

किती वाजता सुरु होणार सामना?

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 चा 29 वा सामना शनिवार, 13 एप्रिल रोजी खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार टॉसच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता मैदानावर असतील.

कुठे पाहणार लाईव्ह सामना?

भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्क तसेच स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर टीव्हीवर DC विरुद्ध MI आयपीएल 2025 चा 29 वा सामना थेट पाहू शकतील. येथे वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचन ऐकण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar वर पाहू शकाल. येथे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकायला मिळेल.